सहसा जगभरात विविध कालमर्यादेनुसार नाताळ अर्थात ख्रिसमस हा कायमच 25 डिसेंबरला साजरा केला जात आहे. पण, काही देश मात्र इथं अपवाद ठरतात.
जगात असेही काही देश आहेत जिथं नाताळ 25 डिसेंबर नव्हे, तर 7 जानेवारीला साजरा केला जातो आणि त्यामागे आहे एक खास कारण.
ज्युलियन कॅलेंडरची मान्यता असल्यानं या देशांमध्ये ख्रिसमस 7 जानेवारीला असतो. यामध्ये रशिया, इस्राईल, इजिप्त, युक्रेन, बल्गेरिया अशा देशांतील ख्रिस्त समुदायाचा समावेश आहे
माल्डोवा, मॅक्डोनिया, इथिओपिया, जॉज्रिया, ग्रीस अशा ऑर्थडॉक्स चर्च धारणांना मानणाऱ्या समुदायांच्या देशांमध्येही 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो.
रोमानिया, सर्बिया, बेलारुस, मोंटेनेग्रो, कझाकस्तान या देशांचाही या यादीत समावेश आहे. ग्रेगोरियन आणि ज्युलियन दिनदर्शिकेत फरक असल्यानं तारखांमध्येही तफावत दिसते.
इजिप्तमधील नागरिक कॉप्टिक ख्रिस्त असून, 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा करण्यापूर्वीचे 43 दिवस सलग उपवास ठेवतात.
अर्मेनियातील अपोस्टोलिक चर्च 6 जानेवारीला ख्रिसमस साजरा करतं.