जगभरातच नव्हे, तर भारतातही काही अशी गावं आहेत जी आजही मुख्य प्रवाहात आलेली नाहीत.
काही गावं अशी आहेत जिथं पुरेशा सुविधा नसल्या तरीही लोकवस्ती मात्र आहे.
पण, या संपूर्ण जगात एक असं गाव आहे जिथं चक्क एकटीच महिला वास्तव्य करते.
जगातील सर्वात लहान गाव असा या गावाचा उल्लेख केला जातो. जे, अमेरिकेतील नेब्रास्का इथं आहे.
या गावात राहणारी महिलाच गावाची काळजीसुद्धा घेते असं म्हटलं जातं.
असं म्हणतात की या गावात राहणाऱ्या महिलेचं नाव एल्सी आयलर असून ती 90 वर्षांची आहे. जगाच्या या गोतावळ्यात एकट्या राहणाऱ्या या महिलेची कमालच.. नाही का...