डोंगरातून कोसळणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह म्हणजेच धबधबा पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करत असतात. धबधबे नेहमीच निसर्गाची शोभा वाढवतात.
अशात, तुम्ही कधी इगाजू धबधब्याविषयी ऐकलं आहे का?
दक्षिण अमेरिकेतील इगाजू फॉल्स ब्राझील किंवा अर्जेंटिना या देशातून पाहता येतात.
शेकडो वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर इगाजू धबधब्याची निर्मिती झाली.
खरंतर, इगाजू धबधबा हा केवळ एकच धबधबा नसून 275 धबधब्यांचा समूह आहे. इतकेच नव्हे, ऋतूनुसार यांची संख्या बदलत राहते.
इगाजूमधील बऱ्याच धबधब्यांची उंची 60 ते 82 मी. इतकी आहे. तसेच, यातील बरेचसे धबधबे हे इगाजू नदीमध्ये कोसळतात.
इगाजू धबधब्यातील डेविल्स थ्रोट हा सर्वात मोठा धबधबा आहे. या धबधब्याचा आवाजदेखील सर्वात जास्त येतो.
इगाजू धबधबा पाहताना तुम्ही तिथल्या कित्येक ठिकाणी इंद्रधनुष्य पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
इगाजू धबधबा हा जगातील सर्वात मोठा धबधब्यांचा समूह असून त्याची रुंदी जवळपास 2.4 किमी इतकी आहे.