वयाच्या 98 व्या वर्षी लागली 7 कोटींची लॉटरी, आता करणार काय?

दुसऱ्या विश्वयुद्धात कामगिरी बजावणाऱ्या एका माजी सैनिकाचे भाग्य उजळले आहे. वयाच्या 90व्या वर्षी या माजी सैनिकाला ७ कोटींची लॉटरी लागली आहे.

Bernard Botting असं या माजी सैनिकाचे नाव असून अमेरिकेतील पाच निवृत्तीवेतनधारकापैंकी ते एक आहेत.

बर्नार्ड यांनी एकदा नव्हे तर तब्बल तीनवेळा लॉटरीची तिकिटे काढली होती. मात्र, यावेळी त्यांचे नशीब फळफळले आहे. त्यांना £228,571 म्हणजे सात कोटींचे बक्षिस मिळाले आहे.

बर्नार्ड हे वयाच्या 17व्या वर्षी ते रॉयल मरीनमध्ये दाखल झाले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ते कार्यरत होते.

सात कोटींची लॉटरी जिंकल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मी ही लॉटरी जिंकू शकतो असं मला स्वप्नातही वाटत नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

लॉटरी जिंकल्यानंतर त्यांनी हा आनंद त्यांच्या कुटुंबासोबत साजरा केला. त्यांच्या पुढच्या तीन पिढ्यांसोबत त्यांनी फोटो शेअर केले आहेत.

लॉटरी जिंकल्यानंतर मिळणाऱ्या रकमेचे समान वाटा करुन मुलांना देईन, असं त्यांनी आधीच म्हटलं होतं. मात्र, त्यातील सर्वाधिक वाटा त्यांच्या मुलीला मिळणार आहे. कारण म्हातारपणात तिने त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली होती.

VIEW ALL

Read Next Story