अंतराळातून पृथ्वीवर परतताच अंतराळवीर सर्वप्रथम काय खातात?
जगातील अनेक राष्ट्र विविध कारणांसाठी अंतराळमोहिमा राबवतात. बरीच राष्ट्र त्यांच्या अंतराळवीरांना संशोधनासाठी अंतराळातही पाठवतात.
अंतराळामध्ये असणाऱ्या स्पेस स्टेशनमध्ये हे अंतराळवीर ठरावील काळासाठी त्यांचं संशोधन करत असतात.
प्रत्येक मोहिमेत अंतराळवीर अंतराळयानात त्यांनी पृथ्वीवरून नेलेले अन्नपदार्थ खातात. यादरम्यान त्यांच्याकडे फारसे पर्यायही नसतात.
आता तुम्ही म्हणाल, म्हणजे पृथ्वीवर येताच ही मंडळी सर्व आवडीचं खात असतील. पण, तसं नाहीये.
पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना सक्तीचे आहार नियम पाळावे लागतात. हे त्यांच्यासाठी बंधनकारक असतं.
यानाबाहेर आल्यानंतर त्यांची वैद्यकिय चाचणी होते. ज्यानंतर त्यांना लिंबूपाणी दिलं जातं. यानंतर त्यांना सफरचंद किंवा पचनास हलकं अन्न दिलं जातं.
सफरचंदानंतर त्यांना मांस आणि इतर फळंही दिली जातात. काही दिवसांपर्यंत अंतराळवीरांना फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थच दिले जातात.
अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांना नियमित आहार दिला जातो.