प्रत्येक देशाची भाषा आणि संस्कृती वेगळी असते.
अनेक देशांमध्ये हॅलो म्हणण्याच्या पद्धती देखील वेगळ्या आहेत. चला जाणून घेऊयात इतर देशांमधील शब्द.
भारतात जेव्हा कोणी व्यक्ती भेटतो, तेव्हा अनेक लोक हॅलो ऐवजी 'नमस्ते' म्हणतात.
स्पॅनिशमध्ये हॅलो ऐवजी 'होला' म्हणत आपले संभाषण सुरु करतात.
फ्रेंचमध्ये जेव्हा आपण आपल्या मित्रांना किंवा कुटुंबाला भेटतो, तेव्हा 'हॅलो'ला 'बोनजॉयर' म्हणतात.
जपानी लोक इतरांशी गप्पा मारताना 'कोन्नीचिवा' म्हणतात. याचा अर्थ 'नमस्कार' असतो.
अरबीमध्ये, हॅलोच्या जागी 'अस-सलामु अलयकुम' म्हणत इतरांना अभिवादन करतात.
कोरियन भाषेत हॅलो म्हणण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. तिथले लोक 'अँन्येओन्घासेयोल' (Anyeonghaseyol) म्हणतात.
रशियन भाषेत हॅलोला 'झेडरोविस्टवायटे' आणि 'प्रिव्हेट' म्हणतात.