माऊंट एव्हरेस्टवर असणारी लहानमोठी हिमशिखरं आणि हा महाकाय पर्वत मागील काही वर्षांमध्ये अतिशय वेगानं वितळत चालला आहे. दशकांपासून यावर असणारा बर्फ वितळू लागल्यानं संशोधकही धास्तावले आहेत.
एका नव्या निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार माऊंट एव्हरेस्ट वितळल्यामुळं त्याचा थेट परिणाम हवामान बदलांच्या रुपात दिसू लागला आहे.
माऊंट एव्हरेस्ट वितळल्यास त्यामुळं पृथ्वीवर हाहाकार माजेल. पिण्याच्या पाण्याचं संकट आणखी गंभीर वळणावर येईल.
पिण्याच्या पाण्याचे साठे हळुहळू संपुष्टात येतील. एव्हरेस्ट वितळण्यास सुरुवात झाली, तर पृथ्वीवरील जवळपास 80 टक्के पिण्याचं पाणी संपुष्टात येईल.
एव्हरेस्ट वितळल्यामुळं त्याचं सर्वाधिक नुकसान मानवी जीवनास होणार असून, काही प्रजाती नष्ट होतील.
माऊंट एव्हरेस्ट वितळण्यास सुरुवात झाली, तर त्यामुळं जगभरात महापुराचं संकट येण्यासमवेत अनेक विषाणूजन्य आजारपणं फोफावतील आणि यामुळं अंतिम स्वरुप म्हणजे जीवसृष्टीचा ऱ्हास होईल. (सर्व छायाचित्र- एआय)