हॅलोविनचे ​​नाव घेताच भयानक चेहरे आणि मोठ-मोठाले भोपळे आपल्या डोळ्यासमोर येतात.


दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी मुख्यतः युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये हॅलोविन साजरा केला जातो.


हॅलोविनच्या वेळी, लोक भोपळे पोकळ करून त्यावर डोळे, नाक, तोंड कोरतात आणि ते भितीदायक बनवून त्यामध्ये मेणबत्त्या ठेवतात, जेणेकरून ते अंधारात अधिक भितीदायक दिसते.


ख्रिश्चन समुदायामध्ये 31 ऑक्टोबर हा सेल्टिक कॅलेंडरचा शेवटचा दिवस मानला जातो. व त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होते.


असे मानले जाते की या दिवशी भूतांसारखे कपडे परिधान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.


या दिवशी, मृत लोकांचे आत्मे पृथ्वीवर प्रकट होतात आणि लोकांना त्रास देतात.


या दुष्ट आत्म्यांना घाबरवण्यासाठी, लोक भितीदायक किंवा भुताचे कपडे घालतात.


या दिवशी, लहान मुले त्यांच्या हातात एक भोपळा धरतात ज्यामध्ये डोळे, नाक आणि तोंड बनवतात आणि त्यामध्ये मेणबत्त्या ठेवतात आणि नंतर सर्व भोपळे पुरले जातात.


मान्यतेनुसार, या दिवशी दुष्ट आत्मे शेतात येऊन पिकांचे नुकसान करू शकतात, म्हणूनच भोपळ्यात मेणबत्ती लावून आत्म्यांना मार्ग दाखवला जातो.

VIEW ALL

Read Next Story