रस्त्यावरील पांढऱ्या, पिवळ्या रेषांचा नेमका अर्थ काय?

May 30,2024

प्रवास

Travel Facts : रस्त्यानं जात असताना, एखाद्या वाहनातून प्रवास करत असताना नजरेसमोर असणाऱ्या रस्त्यावरील अनेक गोष्टी आपल्या दृष्टीक्षेपात येतात.

पांढऱ्या, पिवळ्या रेषा

यावेळी सहसा नजरेतून सुटणारी गोष्ट म्हणजे रस्त्यावर असणाऱ्या पांढऱ्या, पिवळ्या रेषा. रस्त्यांवरील या पांढऱ्या-पिवळ्या रेषांमागे काही नियम आहेत.

सरळ दिशेनं..

तुम्ही तुमच्या लेनमध्ये सरळ मार्गानं गाडी चालवावी, ओव्हरटेक करू नये किंवा लेन बदलू नये असा रस्त्यावर रस्त्यावर असणाऱ्या पांढऱ्या सरळ रेषांचा अर्थ.

पिवळी पांढरी रेष

पिवळी पांढरी रेष तुम्हाला ओव्हरटेक करण्याची परवानगी देते ही बाब अधोरेखित करते. पांढऱ्या तुटक रेषा म्हणजे तुम्हाला रस्त्यावर लेन बदलण्याची किंवा यू-टर्न घेण्याची परवानगी आहे.

दुहेरी सरळ रेषा

दुहेरी सरळ पांढऱ्या रेषेचा अर्थ दोन्ही बाजूंनी वाहने येऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या स्वत:च्या लेनमध्ये वाहन चालवावं.

रेषांचा वापर

दुहेरी सरळ पिवळ्या रेषांचा अर्थ तुम्ही सरळ पुढे जात राहा. पिवळ्या तुटक, सरळ रेषेचा अर्थ होतो, तुम्ही ओव्हरटेक करू शकता. रस्त्यानं जात असताना या रेषा सहसा प्रवाशांची साथ सोडत नाही. त्यामुळं इथून पुढं प्रवास करतना या रेषांचा वापर आणि त्यांचा अर्थ लक्षात ठेवा.

VIEW ALL

Read Next Story