किमान ₹4 Lakh Per Month Salary देणारा देश! अमेरिका, ब्रिटन नाही तर 'इथं' मिळतो जगातील सर्वाधिक पगार

Swapnil Ghangale
Mar 14,2025

'इमिग्रेशन इंडेक्स'

अमेरिकेतील रिमीटली' नावाच्या अर्थविषय संस्थेनं 'इमिग्रेशन इंडेक्स 2025'ची यादी जाहीर केली आहे.

सर्वाधिक पगार देणारा देश

या यादीमध्ये कोणत्या देशांमध्ये इतर देशांमधून येणाऱ्या कामगारांना सर्वाधिक पगार दिला जातो हे सांगितलं आहे.

पाचव्या स्थानी कोणता देश?

सर्वाधिक पगार देणाऱ्या देशांच्या अव्वल पाच यादींपैकी पाचव्या स्थानी नेदरलँडचा समावेश आहे. या देशात सरासरी किमान वार्षिक पगार हा 21 लाख रुपये इतका आहे.

या देशातील वार्षिक पगार 24 लाख रुपये

चौथ्या क्रमांकावर आयर्लंड आहे. या देशातील वार्षिक सरासरी पगार 24 लाख रुपये इतका आहे.

या देशात मिळतो 28 लाख रुपये पगार

तिसऱ्या क्रमांकावर लेक्झमबर्ग हा देश आहे. या देशामध्ये सरासरी किमान पगार 28 लाख रुपये इतका आहे.

दुसऱ्या स्थानी आइसलँड

सर्वाधिक पगार देणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आइसलँडचा क्रमांक लागतो. या देशात सरासरी किंमान वार्षिक पगार 29 लाख रुपये इतका आहे.

पहिल्या क्रमांकावर आहे हा देश

इतर देशातून येणाऱ्या कामगारांना सर्वाधिक सरासरी वार्षिक पगार देणाऱ्या देशांमध्ये पहिल्या स्थानी 51 लाख रुपयांसहीत स्वित्झर्लंड हा देश आहे. म्हणजेच इथला मासिक पगार 4 लाखांपेक्षा अधिक आहे.

सर्वाधिक पगार देणाऱ्या देशांमध्ये या पाच देशांचाही समावेश

या यादीमध्ये डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, बेल्जियम आणि फिनलँडसारख्या देशांचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story