नुकतंच, डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "अमेरिकेवर जितकं आयात शुल्क लावण्यात येईल, तितकंच आयात शुल्क त्यांच्यावर पुन्हा आकारण्यात येईल."
तसेच, 'भारत अमेरिकेवर 100 टक्के आयात शुल्क आकारतो', असाही ट्रंप यांनी भारतावर निशाणा साधला.
2 एप्रिलपासून अमेरिका हा त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आयात शुल्काचा विचार करुन इतर देशांवर आयात शुल्क आकारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मात्र, तुम्हाला जगात सर्वाधिक आयात शुल्क आकारणाऱ्या देशाबद्दल माहितीये?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगात सर्वाधित आयात शुल्क हा भारत देश आकारतो.
भारताने जगातील कित्येक देशांतील साहित्यांवर 100 टक्के आयात शुल्क आकारलं आहे.
तसेच, जास्त आयात शुल्क आकारणाऱ्यांच्या यादीत चीन आणि ब्राझील या देशांचासुद्धा समावेश आहे.
ट्रंप यांनी आपल्या भाषणात साउथ कोरिया या देशाला देखील आयातशुल्काबाबतीत धारेवर धरलं. तसेच दक्षिण कोरिया अमेरिकेहून 4 पट अधिक आयातशुल्क आकारत असल्याचे सांगितले जाते.