जेव्हा तुम्ही हॉटेलची रूम घेता तेव्हा सगळ्यात आधी हिडन कॅमेरा कुठे आहे का ते तपासा. रुममधले सगळ्या खिडक्या बंद करा, लाइट्स बंद कर आणि दरवाजे सगळं बंद करा. काळोखात फोनच्या फ्लॅशमध्ये काना कोपऱ्यात कॅमेरा आहे का ते तपासा.
भिंतीवरील घड्याळे, स्मोक डिटेक्टर, पिक्चर फ्रेम, दिवे, टेडी बेअर किंवा अगदी रोपांची कुंडी यांसारख्या वस्तूंची तपासणी करा.
बाथरूममध्ये छुपे कॅमेरे असण्याची शक्यता कमी आहे, परंतु तरीही ते तपासण्यासारखे आहे. एअर फ्रेशनर, शॉवरहेड्स, टॉवेल रॅक किंवा सजावटीच्या वस्तू असलेल्या जागा तपासून पहा.
कॅमेरा चालू करून खोलीतील प्रत्येक वस्तू तपासा.
रिपोर्ट्सनुसार, काही हॉटेल रूमचे कॅमेरे ब्लूटूथद्वारे ऑपरेट केले जातात. तुम्हाला हॉटेलच्या खोलीबद्दल काही शंका असल्यास, तुमच्या मोबाइल फोनवर ब्लूटूथ चालू करा आणि कोणतीही असामान्य उपकरणे किंवा कनेक्शन तपासा.
अनावश्यक किंवा गरज नसताना वाटणाऱ्या कोणत्याही ठिकाणी वायर दिसल्यास तिथे तपासून पाहा.
हॉटेलच्या प्रत्येक खोलीत छुपे कॅमेरे असण्याची शक्यता नाही. बहुतेक हॉटेल अतिथींची सुरक्षा आणि प्रायव्हसीला प्राधान्य देतात.