28 मार्च रोजी भूकंपाने म्यानमार-थायलंडमध्ये प्रचंड हाहाकार माजवला. ज्याचे पडसाद अजूनही बघायला मिळत आहेत.
भूगर्भशास्त्रानुसार पृथ्वी ही सुमारे १२ टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे.
जेव्हा भूगर्भातील खडक तुटतात किंवा प्लेट्स आदळतात आणि फॉल्टमध्ये वेगाने हालचाल होते तेव्हा भूकंप येतात.
जेव्हा प्लेट्स तुटतात किंवा आदळतात तेव्हा अचानक मोठ्या प्रमाणात ऊर्जा सोडली जाते त्यामुळे भूकंपाच्या लाटा निर्माण होतात ज्यामुळे जमीन हादरते.
भूकंपाच्या वेळी आणि त्यानंतर, रॉक प्लेट्स किंवा ब्लॉक्स हलू लागतात.
पृथ्वीच्या खाली असलेल्या प्लेट्स अतिशय मंद गतीने दर वर्षी 4-5 मिमी खिसकतात.
काही दूर जातात, काही एकमेकांच्या खाली सरकतात. या सरकण्याच्या आणि आदळण्याच्या प्रक्रियेमुळे भूकंप होतो.