पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जवळपास 70 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. यामध्ये समुद्र, बर्फाळ पर्वत आणि नद्यांचा समावेश आहे.
जगात एकूण 5 महासागर आहेत आणि त्यात अथांग पाणी आहे. हे महासागर इतके विशाल आहेत की पाण्याचा तळ गाठणे अवघड होते.
या महासागरांच्या खोलीबाबतीत अनेक रहस्य आहेत आणि त्यातीलच एका रहस्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या विशाल महासागरांपैकी दोन असे महासागर आहेत ज्यांचे पाणी कधीच एकमेकांत मिसळत नाही. हे दोन महासागर एकत्र आल्यावर त्यातील पाण्याचा रंग वेगवेगळा दिसतो, म्हणजेच त्यांच्यातील अंतर स्पष्ट दिसते.
हिंद महासागर आणि प्रशांत महासागर यांचा संगम अलास्काच्या आखातात होतो. मात्र, त्यातील एका महासागराचे पाणी तपकिरी रंगाचे तसेच दुसऱ्याचे पाणी गडद निळ्या रंगाचे दिसते.
खरंतर, या दोन्ही महासागरांच्या पाण्याचे घनत्व, तापमान आणि खारटपणा वेगवेगळा असतो.
भिन्न घनत्व असल्याकारणाने दोन्ही महासागर एकत्र मिळाल्यावरसुद्धा त्यांचे पाणी एकमेकांत मिश्रित होत नाहीत.
गोड्या आणि खाऱ्या पाण्याचे घनत्व भिन्न असल्यामुळे वरच्या पृष्ठभागावर या दोन्ही महासागरातील पाणी कधीच मिसळत नाही.
सूर्याची किरणं पडल्यावर दोन्ही महासागरांच्या पाण्याच्या रंगात बदल होतो आणि महासागरांचे पाणी वेगवेगळे तसेच स्पष्ट दिसते.