world first electrified road: स्वीडनने जगातील पहिला इलेक्ट्रीक रस्ता बनवलाय. जिथे चालत्या गाडीमध्येही चार्जिंग होऊ शकते. इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात मोठं पाऊल आहे.
हा रस्ता इलेक्ट्रीक वाहनांसाठी खास डिझाइन करण्यात आलाय. यामध्ये मूवेबल आर्म आणि पटरीचा उपयोग करण्यात आलाय. ज्यामुळे चालती गाडी चार्ज होऊ शकते.
या रस्त्याच्या वरच्या भागात वीज नाही. त्यामुळे ती सुरक्षित आहे. त्यामुळे उघड्या पायांनीदेखील चालू शकता.
या इलेक्ट्रीक रस्त्यावरुन गाडी चालवताना वाहनचालकांना कोणताही त्रास होणार नाही.
3000 हजार किमी रस्ते इलेक्ट्रीक होणार आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त इलेक्ट्रीक वाहनांना फायदा होणार आहे.
हा इलेक्ट्रीक रस्ता बनवण्यासाठी प्रति किलोमीटर 1.2 मिलियन डॉलर खर्च आलाय. यासाठी नवं तत्रज्ञान आणि डिझाइन वापरण्यात आलंय.
इलेक्ट्रीक वाहनांना चालना देण्यासाठी हे पाऊल महत्वपूर्ण आहे. इतर देशांसाठी ही प्रेरणा ठरणार आहे.
चालती फिरती इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग होणं ही याची जमेची बाजू आहे.