मोठ्या स्फोटानंतर माऊंट एव्हरेस्टहून तिप्पट मोठा धूमकेतू पृथ्वीच्या दिशेनं?
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार माऊंट एव्हरेस्टहून तिप्पट आकारानं मोठा असणारा एक धूमकेतू दुसऱ्या स्फोटानंतर पृथ्वीच्या दिशेनं येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
12पी/पोंस-ब्रूक्स असं या धूमकेतूचं नाव. हा एक क्रायोवोल्केनिक किंवा ज्वालामुखीचा धूमकेतू असून त्याचा व्यास 18.6 मैल (30 किमी) आहे. असं या धूमकेतूचं नाव. हा एक क्रायोवोल्केनिक किंवा ज्वालामुखीचा धूमकेतू असून त्याचा व्यास 18.6 मैल (30 किमी) आहे.
5 ऑक्टोबरला या धूमकेतूचा स्फोट झाला. मागच्या चार महिन्यांमध्ये या धूमतेतूत झालेला हा दुसा मोठा स्फोट होता.
12पी/पोंस-ब्रूक्स या धूमकेतूच्या आजुबाजूला धुळ आणि वायूची वलयं आहेत.
परावर्तित प्रकाशामुळं या धूमकेतूमध्ये हजारो पटींनी अधिक उर्जा आहे. दरम्यान स्फोटानंतर हा धूमकेतू नेमका किती मोठा झाला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
हो, पण हा दुसरा स्फोट तुलनेनं मोठा असून, त्यामुळं काही मोठे बदल झाले असणार ही शक्यताही नाकारली जात नाही.