विमानाच्या खिडकीतून असं काय दिसलं की करावी लागली एमरजेन्सी लॅन्डिंग!
न्यूयॉर्कच्या दिशेनं निघालेल्या Virgin Atlantic च्या विमानाचं उड्डाण टेकऑफ ऐवजी तातडीनं हे विमान एमरजेन्सी लँड करत रद्द करण्यात आलं . त्यानंतर प्रवाशांचा पहिला प्रश्न होता, असं नेमकं का झालं?
विमानातून इंजिनिअर्सना अचानकच फोन गेला आणि त्यांना Airbus A330 विमानाची तांत्रिक पाहणी करण्यास सांगण्यात आलं. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला.
व्हायरल व्हिडीओमध्ये इंजिनिअर्स विमानाच्या पंखांपाशी काहीतरी पाहत / शोधत असल्याचं लक्षात आलं. ते जी वस्तू शोधत होते ती होती एक लहानसा स्क्रू.
41 वर्षीय ब्रिटीश प्रवासी Phil Hardy ला खिडकीतून विमानाच्या पंखांवरून एक स्क्रू अपेक्षित जागी नसल्याचं लक्षात आलं आणि त्यानं तातडीनं केबिन क्रूच्या ही बाब लक्षात आणून दिली.
विमानात कोणताही बिघाड नाही, अशी हमी विमानसेवा कंपनीनं त्या प्रवाशाला दिली. पण, तरीही सुरक्षेच्या कारणास्तव त्यानं तपासणीची विनंती उचलून धरली.
सरतेशेवटी संपूर्ण विमानाच्या पाहणीसाठी विमान कंपनीकडून हे उड्डाणच रद्द करण्यात आलं आणि पुढं प्रवाशांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवत विमान पाहणीसाठी पाठवण्यात आलं.