इन्व्हेस्टमेंट मायग्रेशन फर्म हेनले अँड पार्टनर्स या संस्थेने जगातील सर्वात श्रीमंत शहरांची यादी जाहीर केली आहे.
अहवालानुसार अमेरिकीतील न्यूयॉर्क हे शहर जगातील सर्वात श्रीमंत शहर आहे. न्यूयॉर्कमध्ये तब्बल 58 अरबपती राहातात.
जपानची राजधानी टोकियो हे शहर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात श्रीमंत शहर आहे. टोकियोत 14 व्यक्ती अरबपती आहेत.
अमेरिकेतलंच सॅन फ्रँन्सिस्को आणि सिलिकन व्हॅली एरिया हा तिसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत शहर आहे.
ब्रिटनची राजधानी लंडन श्रीमंत शहारांच्या टॉप टेन यादीतलं एकमेवक युरोपीयन शहर आहे. लंडन जगातलं चौथं श्रीमंत शहर आहे.
सिंगापूर जगात सर्वाधिक बिझनेस फ्रेंडली शहर मानलं जातं. त्यामुळेच हे शहर पाचवं श्रीमंत शहर आहे.
इंटरटेनमेंट, मीडिया, रिअल इस्टेट आणि तंत्रज्ञानासारखे प्रमुख उद्यागो असलेलं शहर म्हणजे लॉस एंजिल्स. हे शहर सहाव्या क्रमाकांचं श्रीमंत शहर आहे.
हाँगकाँग जगातलं सातव्या कम्राकांचं श्रीमंत शहर आहे. हाँगकाँगमध्ये 32 जण अरबपती आहेत.
अहवालानुसार भारताची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर श्रीमंत शहरांच्या यादीत 21 व्या क्रमांकावर आहे. मुंबईत तब्बल 29 अरबपती राहातात.
नवी दिल्ली हे शहर जगातील 36 वं श्रीमंत शहर आहे. दिल्लीत 16 अरबपती आहेत.