Taste Atlas नं नुकतीच एकत यादी जाहीर केली असून, यामध्ये जगातील सर्वोत्तम सँडविचची नावं देण्यात आली आहेत. मुंबईचा वडापाव या यादीत कितवा माहितीये?
यादीत पहिलं स्थान आहे व्हिएतनामच्या बान मी (Banh Mi) सँडविचचं.
दुसऱ्या स्थानावर आहे तुर्कीचं तोंबिक डोनेर (Tomnik Doner).
या यादीत तिसरं स्थान मिळालं आहे लेबननंच्या श्वारमाला.
मेक्सिकोचं तोर्तास (Tortas) या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
अमेरिकेच्या लॉबस्टर रोलला या यादीत पाचवं स्थान मिळालं आहे.
सँडविच डे लोमो या अर्जेंटिनाच्या पदार्थाला यादित सहावं स्थान मिळालं आहे.
या यादीत सातवं स्थान आहे कॅनडाच्या माँटेरिअल स्मोक्ड मीट या सँडविचला.
इटलीचं मॉझ्झरेला कॅरोझ्झा हे सँडविच यादीत आठव्या स्थानावर आहे.
नवव्या स्थानी आहे व्हिएतनामचंच मीट अँड कोल्ड कट्स बान मी.
दहाव्या स्थानावर अमेरिकेचं टेक्सस ब्रिस्केट सँडविच आहे.
भारतातील आणि त्यातही मुंबईतील वडापाव या यादीमध्ये 19 व्या स्थानावर आहे. आहे की नाही कमाल बाब!