)
Gautami Patil Pune Accident Case: मुंबई-बेंगलुरू महामार्गावरील वडगाव बुद्रुक येथे 30 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता गौतमी पाटीलच्या कारचा अपघात झाला होता. लोकप्रिय लावणी कलाकार गौतमी पाटील्या गाडीने रिक्षाला मागून धडक दिली होती. त्यावेळी गौतमी रिक्षामध्ये नव्हती. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे (४४) आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने पळ काढला होता. पण यानंतर गौतमीलला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता रिक्षाचालकाचे कुटुंब गौतमी पाटीलसह पहिल्यांदा कॅमेरासमोर आले आहे. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? जाणून घेऊया.
वडगाव बुद्रुकमधील हॉटेल विश्वासजवळील सर्व्हिस रोडवर रिक्षाचालक सामाजी मरगळे प्रवासी घेण्यासाठी थांबले असताना, भरधाव वेगाने आलेल्या एमएच १२ डब्ल्यूझेड ६५८९ क्रमांकाच्या कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धक्का दिला. धडके इतकी प्रचंड होती की रिक्षा खराब झाला आणि मरगळे व दोन प्रवासी सांगलीत रक्तबंबाळ झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळ सोडून पळ काढला. सिंहगड रोड पोलिसांनी मरगळेंचा मित्र युवराज साळवे यांच्या तक्रारीवर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गाडी जप्त करण्यात आली आहे.
गौतमी पाटीलवर गंभीर आरोप करणारं मरगळे कुटुंब आलं समोर, 'माझ्या वडिलांना..'#GautamiPatil #PuneAccident pic.twitter.com/IcGG1Wcr9s
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 16, 2025
अपघात वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. तिचा चालक गाडी चालवत होता, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सिंहगड पोलिसांनी गौतमीला नोटीस बजावली होती पण ती हजर झाली नव्हती. गौतमींनी माध्यमांना सांगितले की, "माझे नाव बदनाम होत आहे, मी अपघातावेळी गाडीत नव्हते." मात्र, कुटुंबाचा दावा आहे की, मूळ आरोपीला पाठीशी घालण्यात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. गौतमीने ड्रायव्हरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. तरी त्याच्या अटकेची मागणी वाढत आहे.
मरगळे कुटुंबाने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जनता दरबारात मदतीची विनंती केली. पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना फोन करून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यावर टीका केली की, "गौतमी अपघातावेळी गाडीत नव्हती तरी चंद्रकांत पाटीलांकडून दबाव टाकला जातोय. मग इतर गुन्हेगारांना का सोडलं?" यामुळे प्रकरणाने राजकीय वळण घेतले असून, पवार यांनी पीडित कुटुंबाला न्याय आणि भरपाईची मागणी केली होती.
गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केला.
माझ्या वडिलांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तेव्हा गौतमी ताईंनी माझ्या वडिलांच्या तब्येतीचा आढावा घेतला. आम्ही अप्रोच केला यानंतर त्या आल्या. त्यांनी आमची विचारपूस केली. यासाठी त्यांचे खरंच धन्यवाद, असे मरगळे कुटुंबाने म्हटले आहे. गौतमीने यासंदर्भातील व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलाय.
उत्तर: ३० सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजता वडगाव बुद्रुक येथील सर्व्हिस रोडवर गौतमी पाटील यांच्या मालकीच्या कारने (एमएच १२ डब्ल्यूझेड ६५८९) रिक्षाचालक सामाजी मरगळे यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यात मरगळे आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. मरगळे कुटुंबाने गौतमींच्या टीमने दखल न घेतल्याचा आणि पोलिसांनी सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. चालक पळून गेल्याने आणि गौतमी नोटिशीला हजर न झाल्याने संशय वाढला आहे.
उत्तर: मरगळे कुटुंबाने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यावरून चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला. कुटुंबाने पोलिसांवर मूळ आरोपीला पाठीशी घालण्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन सुरू केले, ज्याला शिवसैनिकांचा पाठिंबा आहे. पोलिसांनी गौतमी पाटील यांना नोटीस बजावली, पण त्या हजर झाल्या नाहीत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले.
उत्तर: मरगळे यांच्या मुलीने सांगितले की, वडिलांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर गौतमी पाटील यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली, याबद्दल त्यांनी आभार मानले. मात्र, कुटुंबाचा आक्षेप आहे की, अपघाताची जबाबदारी कोणी घेतली नाही आणि पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही. कुटुंबाने न्याय आणि आर्थिक मदतीसाठी आंदोलन आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.