Koregaon Park Land Deal Parth Pawar Amedia Company Address: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीच्या माध्यमातून पुण्यात झालेल्या जमीन खरेदी व्यवहारामध्ये प्रशासन खडबडून जागं झालं आहे. या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश देण्यात आल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून प्रकरणामुळे राजकीय संघर्षाला तोंड फुटलं आहे. अजित पवारांवर टीका होत असतानाच अजित पवारांना पार्थ पवारांच्या कंपनीची नोंदणी त्यांच्या बंगल्याच्या नावावर असल्याचा प्रश्न विचारण्यात आला असता ते पत्रकारावर संतापल्याचं दिसून आलं.
पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये महार वतनाची 40 एकर जमीन गैरव्यवहाराच्या माध्यमातून 300 कोटी रुपयांना खरेदी केली. या व्यवहारासाठी 21 कोटींच्या मुद्रांकन शुल्काऐवजी केवळ 500 रुपये भरण्यात आले. या कंपनीची नोंदणी जिजाऊ बंगल्याच्या पत्त्यावर झाली असून अमेडिया होल्डिंग कंपनीचा पत्ता सर्व्हे नंबर 132, बी 21 यशवंत घाडगे नगर, शिवाजीनगर पुणे - 411005 असा आहे. ही मूळ प्रॉपर्टी अजित पवारांची असून यावरुनच त्यांना पत्रकारांनी सवाल विचारला. पार्थ पवारांच्या कंपनीचं भागभांडवल अवघं एक लाख रुपये इतकं असताना तिच्या नावाने हा जमिनीचा 300 कोटींचा व्यवहार झाला.
"कंपनीचा जो पत्ता आहे तो आपल्या घरचा पत्ता असल्याचं कळतंय सर," असं म्हणत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. इतक्यात दुसऱ्याने, '21 कोटी रुपये...' असं म्हणत पुढचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र अजित पवारांनी पहिल्याच प्रश्नावर उत्तर देताना पत्रकाराला, "अरे बाबा, ऐक ना! तुलाच फार कळतं का? मी स्वत:हून आलो ना?" असा सवाल संतापून विचारला. "कानावर आल्यावर मी एवढच सांगितलं की, कुठल्याही चुकीच्या गोष्टी करु नका. एवढं तर मी सांगणार ना?" असा सवाल अजित पवारांनी विचारला. "त्या पद्धतीने मी सांगितलं आहे. पण आता तुम्ही जे काही स्टॅम्प ड्युटी म्हणताय आणखीन काही म्हणताय. त्याची शहानिशा करतो ना," असंही अजित पवार म्हणाले.
नक्की वाचा >> ₹500 च्या नोंदणीवरुन 300 कोटींची जमीन खरेदी करणारे पार्थ पवार किती श्रीमंत? जिजाई बंगला अन्...; संपत्तीचा तपशील समोर
"मीच राज्याचा अर्थमंत्री असताना कुठेही, कोणत्याही व्यवहारात टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे. सगळ्याच बाबतीत नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजेत. कोणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये, हेच माझं म्हणणं आहे," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 151/9
|
VS |
SIN
155/7(19.1 ov)
|
| Singapore beat Indonesia by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.