People Coming to Pune city Top 5 districts : पुणे... महाराष्ट्राच्या नकाशावरील सर्वात लोकप्रिय शहर. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांंचे श्रीमंत शहर म्हणजे पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर अशी पुणे शहराची ओळख. शिक्षण, नोकरी आणि व्यवसाच्या निमित्ताने लाखो लोक पुण्यात स्थलांतरित होतात. पुण्यात महिला देखील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. महाराष्ट्रात एक असा जिल्हा आहे जेथून पुण्यात स्थलांतरित होणाऱ्या महिलांचा आकडा आहे पुरुषांपेक्षा सर्वाधिक आहे. जाणून घेऊया हा जिल्हा कोणता?
पुणे हे फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील एक महत्त्वाचे शहर आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील लोक येथे नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी स्थलांतर करतात. पुण्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून लोक येत असले तरी, पुणे शहरात सर्वाधिक लोक अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतून येतात. पुणे शहराच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी या जिल्ह्यांतून लोक स्थलांतर करतात.
अहिल्यानगर अर्थात अहमदनगर हे पुणे शहरापासून जवळ असल्याने अनेक लोक नोकरी आणि शिक्षणासाठी येथे येतात. सरासरी 3 लाख 50 लाख पुण्यात येतात. यापैकी 1 लाख 88 हजार महिला आहेत. सातारा हा पुणे जिल्ह्याला लागून असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातील लोक शिक्षण आणि व्यवसायासाठी पुणे शहरात येतात. 2 लाख 50 हजार वोक पुण्यात येतात. यापैकी 1 लाख 28 हजार महिला आहेत.
सांगली जिल्ह्यातील लोक देखील शिक्षण आणि रोजगारासाठी पुणे शहराला निवडतात. पुण्यात चांगली रोजगार संधी उपलब्ध आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने पुण्यात येतात. लातुरमधून 1 लाख 10 हजार लोक स्थलांतर करतात. 50 हजार पेक्षा जास्त महिला आहेत. धाराशीव जिल्ह्यातून देखील लोक मोठ्या संख्येने येतात. 1 लाख 50 हजार लोक पुण्याची वाट धरतात. यापैकी 80 हजार महिला आहेत.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून महिला मोठ्या संख्येने पुण्यात स्थलांतरित होतात. पुणे-सोलापूर रोडने जोडलेले असल्याने सोलापूर जिल्ह्यातील लोक देखील पुण्याला नोकरी आणि व्यवसायासाठी येतात. सोलापुर जिल्ह्यातून सर्वाधिक महिला पुण्यात येतात. सोलापूर जिल्ह्यातून 4 लाख 2 हजार लोक पुण्यात स्थलांतरित होतात. 2 लाख 20 हजार पेक्षा जास्त महिला पुण्यात येतात. उत्तम शिक्षण तसेच नोकरीच्या निमित्ताने सोलापुरातील महिला पुण्यात येतात. पुणे हे सोलापुरपासून जवळ असल्या कारणामुळे महिलांना प्रवास आणि सुरक्षेच्या दृष्टीने पुणे जिल्हा योग्य वाटतो. यामुळे शिक्षण आणि नोकरीसाठी सोलापुरातील महिला पुणे जिल्ह्यालाच प्राधान्य देतात.