पुण्यातील खेडेगावात सुरु केली डायरेक्ट अमेरिकेला टक्कर देणारी BAAP IT कंपनी; गावातच 600 पोरांना दिली लाखो रुपयाच्या पगाराची नोकरी

 अमेरिकेतील नोकरी सोडून पुण्यातील एका खेडगावात IT कंपनी सुरु केली. यामुळे गावातील तरुणांना लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी मिळाली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 9, 2025, 10:16 PM IST
पुण्यातील खेडेगावात सुरु केली डायरेक्ट अमेरिकेला टक्कर देणारी BAAP IT कंपनी; गावातच 600 पोरांना दिली लाखो रुपयाच्या पगाराची नोकरी

Pune BAAP IT Compny Raosaheb Ghuge : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात लाखो IT कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली आहे. अशातच आता पुण्यातील एका छोटाशा खेडेगावातील IT कंपनी चर्चेत आली आहे.  अमेरिकेतील नोकरी सोडून रावसाहेब घुगे यांनी गावातच IT कंपनी सुरु केली.  आयटी क्षेत्र मुंबई आणि पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये पसरलेले आहे, जिथे नोकरी मिळवणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते, परंतु शेतकऱ्यांच्या मुलांना मोठ्या शहरात जाऊन नोकरी मिळवणे सोपे नसते. रावसाहेब घुगे यांनी गावातच तरुणांसाठी IT कंपनी सुरु केली. 

Add Zee News as a Preferred Source

अहिल्यानगर येथील रावसाहेब घुगे यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत उच्च पगाराची आयटी नोकरी मिळवली, परंतु कोरोना काळात ते आपल्या गावी परतले तेव्हा त्यांनी गावाच्या विकासासाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला. त्यांनी त्यांच्या गावी माळरानावर एक आयटी कंपनी  सुरु केली. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना आता गावातच लाखो रुपयांची नोकरी मिळत आहे.

रावसाहेब घुगे यांनी त्यांच्या गावातील फोंडा माळरानावर BAAP ही आयटी कंपनी स्थापन केली. त्यांच्या गावात "BAAP (बिझनेस अॅप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स)" नावाची आयटी कंपनी स्थापन केली. कंपनीने जवळच्या गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य दिले. आता, शेतकरी कुटुंबातील मुले त्यांच्या स्वतःच्या गावातील आयटी कंपन्यांमध्ये काम करत आहेत. घुगे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक विशेष एआय मॉडेल विकसित केले आहे . या मॉडेलमुळे गावातील शिक्षण व्यवस्था सुधारली आहे. मुलांच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळतात. त्यांनी गावातील तरुणांना आयटी क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी एक केंद्र देखील स्थापन केले आहे. येथे विविध कोडिंग भाषा आणि इतर आयटी कौशल्ये शिकवली जातात.

रावसाहेब घुगे यांनी आतापर्यंत 600 हून अधिक तरुणांना प्रशिक्षण दिले आहे आणि त्यापैकी 120 हून अधिक तरुणांना आधीच नोकऱ्या मिळाल्या आहेत. ते  पुण्यातील काही कंपन्या त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहेत. या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश ग्रामीण तरुणांना नोकरीसाठी शहरांकडे स्थलांतरित होण्यापासून रोखणे आणि त्यांना त्यांच्या गावात राहून आयटी क्षेत्रात काम करण्याची परवानगी संधी देणे आहे. 

FAQ

1 अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा आयटी क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे?
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात लाखो आयटी कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी गावातच संधी निर्माण करण्याची गरज उद्भवली असून, पुण्याजवळील एका छोट्या खेड्यातील आयटी कंपनी चर्चेत आली आहे.

2 रावसाहेब घुगे यांनी आयटी कंपनी कशी आणि का सुरू केली?
रावसाहेब घुगे यांनी उच्च शिक्षणानंतर अमेरिकेत उच्च पगाराची आयटी नोकरी मिळवली होती. कोरोना काळात गावी परतल्यानंतर त्यांनी गावाच्या विकासासाठी संकल्प केला आणि फोंडा माळरानावर BAAP ही आयटी कंपनी सुरू केली. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना गावातच लाखो रुपयांची नोकरी मिळत आहे.

3 BAAP ही कंपनी काय आहे आणि तिचा उद्देश काय आहे?
 BAAP म्हणजे "बिझनेस अॅप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स". ही कंपनी अहिल्यानगर (पुण्याजवळील गाव) येथे स्थापन झाली असून, जवळच्या गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देते. मुख्य उद्देश ग्रामीण तरुणांना शहरांकडे स्थलांतरित होण्यापासून रोखणे आणि गावात राहून आयटी क्षेत्रात काम करण्याची संधी देणे हा आहे.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More