Kalyani Deshpande Racket: पुण्यातील कुप्रसिद्ध कल्याणी देशपांडे ला पिंपरी- चिंचवडच्या अंमली विरोधी पथकाने आंध्रप्रदेशमधून बेड्या ठोकल्या आहेत. पिटासह मोका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगून आलेली कल्याणी गांजा विक्री रॅकेट ची मास्टरमाइंड आहे. काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याणी देशपांडेच्या गांजा रॅकेट चा पर्दाफाश केला होता. तिच्या पतीसह जावयाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या होता. कल्याणी देशपांडे फरार होण्यात यशस्वी झाली होती. अखेर तीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अटकेमुळे कल्याणी देशपांडेची डेंजर स्टोरी पुन्हा एकदा चर्तेत आली आहे.
कल्याणी देशपांडेकडे पाहिले असता एक सुसंस्कृत, सुशिक्षित आणि उच्चभ्रू समाजातील बाई अशी तिची प्रतिमा वाटते. कल्याण रेकॉर्डमधली एक अट्टल गुन्हेगार आहे. तब्बल 22 वर्षाच्या गुन्हेगारी कारकीर्दीत तिच्यावर 21 प्रकारची सेक्स रॅकेट आणि काही खुनांच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले. जयश्री उर्फ कल्याणी देशपांडे असं तिचं नाव. पुण्यातल्या बऱ्याचं आयटी कंपन्यांमध्ये ती हायप्रोफाईल रॅकेट चालवायची.
पुण्यातील एक उच्चभ्रू परिसरात कल्याणी देशपांडे तिच्या बंगल्यातून व्हीनस एस्कॉर्ट्स नावाची एस्कॉर्ट एजन्सी चालवत होती. पाषाण रोडजल तीचा हा बंगला होता. हा बंगला वेश्याव्यवसाय आणि गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध होता. कल्याणीचा हा व्यवसाय बिनबोभाटा सुरु होता. डिसेंबर 2007 मध्ये याच बंगल्यात अनिल ढोले नावाच्या व्यक्तीचा खून झाला. अनिल ढोले हा कल्याणीचा जवळचा सहकारी. अनिल ढोले याच्या हत्येमुळे कल्याणीचा वेश्याव्यवसाय उघडकीस आला.
अनिल ढोले हा मुंबईहून वेश्याव्यवसायासाठी कॉल गर्ल्स आणण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता असा आरोप केला जातो. ढोले याच्या हत्येनंतरही कल्याणीचा व्यवसाय सुरु होता. पुणे आणि इतर भागात वेश्याव्यवसायासाठी देश-विदेशातील मुलींचा पुरवठा करत होती. कल्याणीने एक मोठे नेटवर्क तयार केले कल्याणी देशपांडेने हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये एक मजबूत नेटवर्क तयार केले. तिचे अनेक हाय-प्रोफाइल क्लायंट होते. याशिवाय, कल्याणीला गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल अनेक वेळा अटक करण्यात आली आहे. कल्याणीविरुद्ध मुंबईतही फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. डिसेंबर 2005 मध्ये, पुण्याच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये सेक्स वर्करच्या हत्येत कल्याणीचे नाव समोर आल्यानंतर पहिल्यांदाच तिच्याविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात पहिला एफआयआर हवेली पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. यानंतर मकोका प्रकरणातून ती निर्दोष सुटली. 31 मार्च 2012 रोजी हिंजवडी पोलिसांनी कल्याणीला वेश्याव्यवसायाच्या एका प्रकरणात अटक केली. यानंतर अनकेदा तिला याप्रकरणात अटक झाली मात्र, ती नेहमीच जामिनावर सुटून बाहेर यायची आणि पोलिसांना चकवा देत वेश्याव्यवसाय चालवत राहिली. तब्बल 25 वर्ष ती पुण्याच्या IT कंपन्याना सेक्स वर्कर पुरवत होती. पुण्यात तिचे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवले.
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.