)
Pune Real Estate: भारतातील प्रमुख शहरांमध्ये मालमत्तेच्या किमती वेगाने वाढत आहेत. महाराष्ट्रातील पुणे शहरात घरांच विक्री घटली आहे. पुणे, बेंगळुरूनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आयटी हब आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका जगभरातील IT क्षेत्राला बसला आहे. पुण्यातील IT पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली आहे. याचा फटका रिअल इस्टेट मार्केटला बसला आहे. यामुळे पुण्यात घरांची विक्री घटली आहे.
प्रॉपर्टी कन्सल्टंट नाईट फ्रँक इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर दरम्यान, पुण्यातील घरांच्या विक्रीत दरवर्षी 8 टक्क्यांनी घट झाली आहे. ही घट चिंताजनक देखील आहे कारण त्याच कालावधीत देशातील इतर प्रमुख शहरांमधील विक्री स्थिर राहिली आहे किंवा वाढली आहे. आठ प्रमुख शहरांमध्ये 87,603 घरांची विक्री झाली. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार, 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये एकूण 87603 घरे विकली गेली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 1 टक्के जास्त आहे. मुंबईत सर्वात जास्त घरांची विक्री झाली आहे. मुंबईने 24, 706 युनिट्सची विक्री करून यादीत अव्वल स्थान पटकावले, ज्यामध्ये वार्षिक आधारावर 2 टक्के वाढ झाली. मुंबई व्यतिरिक्त, चेन्नईमध्ये सर्वाधिक 12 टक्के वाढ झाली, येथे एकूण 4,617 घरे विकली गेली. राष्ट्रीय राजधानी दिल्ली एनसीआर आणि बेंगळुरू सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्येही स्थिरता राहिली.
देशभरातील इतर शहरांमध्ये मालमत्तेचे दर वाढत असताना, पुण्यात असे का घडत आहे याबद्दल प्रश्न उपस्थित होतात. अहवालात याचे स्पष्ट कारण दिलेले नाही, परंतु पुणे इतर शहरांपेक्षा लक्षणीयरीत्या घट झाल्याचे समोर आले आहे. विक्रीत घट झाली असली तरी, पुण्यातील मालमत्तेच्या किंमती वाढतच आहेत. अहवालांनुसार, पुण्यातील घरांच्या किमती वर्षानुवर्षे 5 टक्केने वाढल्या आहेत. विक्री कमी होत आहे पण किमती वाढत आहेत अशी विरोधाभासी परिस्थिती आहे. त्यामुळे पुण्यातील गुंतवणूकदारांनी घरांमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पुण्याच्या IT पार्कमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने अनेक जण दुसऱ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. याचा फटका देखील पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटला बसला आहे.
FAQ
1 २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत पुण्यातील घरांच्या विक्रीत किती घट झाली आहे?
नाईट फ्रँक इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान पुण्यातील घरांच्या विक्रीत दरवर्षी ८ टक्क्यांनी घट झाली आहे. ही घट चिंताजनक आहे, कारण इतर प्रमुख शहरांमध्ये विक्री स्थिर राहिली किंवा वाढली आहे.
2 देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण किती घरांची विक्री झाली आणि ती गेल्या वर्षीपेक्षा किती जास्त आहे?
आठ प्रमुख शहरांमध्ये एकूण ८७,६०३ घरांची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १ टक्के जास्त आहे.
3 कोणत्या शहरात सर्वाधिक घरांची विक्री झाली आणि त्यात किती वाढ झाली?
मुंबईत सर्वाधिक २४,७०६ युनिट्सची विक्री झाली, ज्यात वार्षिक आधारावर २ टक्के वाढ झाली. मुंबईने यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.