...अन् रणजितसिंह निंबाळकर महिलांसमोरच धाय मोकलून रडू लागले; Video चर्चेत! खरं कारण समोर

Ranjeetsinha Naik Nimbalkar Crying: जाहीर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपलं म्हणणं सविस्तरपणे मांडलं. यादरम्यान त्यांनी सुषमा अंधारेंबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही माफी मागण्याचं दिसून आलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 4, 2025, 07:49 AM IST
...अन् रणजितसिंह निंबाळकर महिलांसमोरच धाय मोकलून रडू लागले; Video चर्चेत! खरं कारण समोर
फलटणमध्ये घडला हा सारा प्रकार

Ranjeetsinha Naik Nimbalkar Crying: फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अनेक आरोप झालेले भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोमवारी जाहीर पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं आहे..महिला डॉक्टर आत्महत्या आणि आगवणे प्रकरण त्याचबरोबर बीड ऊस तोड कामगार प्रकरण अशा अनेक विषयात जे आरोप झाले होते त्यासंदर्भात पुरावे देत या प्रकरणात मी दोषी नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सगळ्या आरोपांमागे मास्टर माईंड म्हणजेच रामराजे नाईक निंबाळकर असल्याचा आरोप रणजितसिंह निंबाळकरांनी केला. तुमच्यात दम असेल तर लाय डिटेक्टर टेस्टचे आव्हान स्वीकारा नाहीतर नाईक निंबाळकर नाही हे जाहीर करा अशी टीका केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

सुषमा अंधारेंची मागितली माफी

"ही जाहीर सभा नाही तर जाहीर पत्रकार परिषद घेत आहे. त्या बिचाऱ्या आत्महत्या केलेल्या भगिनीला श्रद्धांजली वाहिली," असं म्हणत निंबाळकरांनी बोलण्यास सुरुवात केली. "माझ्या हजारो भगीनी आल्या आहेत त्यांचे स्वागत करतो. माझ्या भगिनी सुषमाताई आल्या त्यांचे मी स्वागत करतो. त्यांच्याबद्दल जर कोणी अपशब्द वापरले असतील तर त्याची मी माफी मागतो," असंही निंबाळकर म्हणाले. "ज्याला ज्याला आज प्रश्न विचारायचे आहेत त्याला कोणालाही आज नाराज करणार नाही," असं म्हणत त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तर देण्यास तयार असल्याचं म्हटलं.

माझ्यामुळे देवेंद्र फडणवीसांना नाव ठेवलं

"घरी एक वर्ष आम्ही एकच घोषणा दिली आहे. आपल्याला बदल आणायचा असून बदला घ्यायचा नाहीये. रणजितसिंह  चुकीचा वागत नाही म्हणूनच सर्व जनता माझ्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांना कोणत्याही पोलिसांचा रिपोर्टची आवश्यकता नव्हती त्यांच्या अंतर्मनाला माहीत होतं हा रणजीत कधीही चुकणार नाही. माझ्यामुळे लोकांनी देवेंद्रजीनाही नाव ठेवले त्याबद्दल मी त्यांची ही माफी मागतो," असं पत्रकारांसमोर बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नमूद केलं. 

ती ऑडिओ क्लिप ऐकवली

"या तालुक्याचे आमदार विधान परिषदेचे आमदार यांनी काल चॅलेंज केलं की माझं नाव घेऊन दाखवा तर आज मी जाहीर चॅलेंज करतो की या तालुक्याची बदनामी झाली ती त्यांच्यामुळे झाली. मी सगळ्यांचे आरोप वाचणार आहे. माझी एक ऑडिओ क्लिप तोडून मोडून वापरली गेली. मी खरी सगळी ऑडिओ क्लिप आज ऐकवणार आहे," असं म्हणत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खरी क्लिपही ऐकवली. दिगंबर आगवणे प्रकरणात केलेल्या आरोपांनाही रणजित निंबाळकर यांनी उत्तर दिलं.

लाय डिटेक्टरला तयार व्हा

"तुम्हीही लाय डिटेक्टरला तयार व्हा. मुंबईत भर चौकात लावा. पहिली माझी चाचणी घ्या नंतर तुमची घ्या. मला कोणतेही प्रश्न विचारा. नाहीतर जाहिर माफी मागा. तुमच्यात दम असेल तर आव्हान स्वीकारा नाहीतर नाईक-निंबाळकर नाही हे जाहीर करा," असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकर यांना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवाहन केलं.

धाय मोकलून रडले

या पत्रकारपरिषधेनंतर उपस्थित असलेल्या महिलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दृष्ट काढली. त्यांना दुग्धाभिषेक घातला. यावेळेस रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अश्रू अनावर झाले ते धाय मोकलून रडताना दिसले.

आंदोलन मागे

दरम्यान, दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधीत आंदोलन मागे घेतले आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More