Mumbai To Goa Ro Ro Boat : होळी, मे महिना, गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) हे काही असे टप्पे जेव्हा महाराष्ट्रातील शहरी भागांमधून अनेकांचेच पाय खेड्यापाड्याकडे वळतात. त्यातही कोकणच्या दिशेनं जाणाऱ्यांचा आकडा तुलनेनं मोठा. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की त्याआधीच काही महिन्यांपूर्वी या सणासाठी रेल्वे आणि एसटीच्या तिकीटाच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात होते. पण, प्रवाशांची वाढती संख्या पाहता जादा पर्याय उपलब्ध करून देऊनही अनेकदा काही प्रवाशांना मात्र निराशेचाच सामना करावा लागतो.
वरील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आता महाराष्ट्र शासनानं एत अतिशय कमाल उपाय अमलात आणण्याचा विचार केल्याचं स्पष्ट होत आहे. हा विचार म्हणजे मुंबई ते गोवा रो-रो बोट सेवा. कोकणात दरवर्षी गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. याचदरम्यान मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतून अनेकजण कोकणत्या दिशेनं रवाना होतात. याच धर्तीवर प्रवाशांच्या अडचणी केंद्रस्थानी ठेवत मुंबई ते गोवा रो रो सेवेची आखणी करण्यात येत असून राज्य शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर विभाग मुंबई ते गोवा रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) बोट सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. खुद्य मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली.
रो रो बोट सेवा उपलब्ध झाल्यास सागरी मार्गानं प्रवास करत असतानाही प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या वाहनांनी प्रवास करता येईल. या सेवेअंतर्गत प्रवाशांना मुंबईतील माझगाव डॉक इथं जहाजावर चढता येईल. जवळपास साडेचार तासांमध्ये या माध्यमातून कोकणातील सिंधुदुर्ग इथं असणाऱ्या देवगड किनाऱ्यावर प्रवाशांना उतरता येईल. फक्त कोकणापर्यंतच नव्हे तर प्रत्यक्षात ही सेवा गोव्यापर्यंत विस्तारेल आणि या गोव्यापर्यंतच्या प्रवासासाठी साधारण साडेसहा तासांचा वेळ लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सदर रो रो "या उपक्रमामुळे हजारो भाविकांना आवश्यक दिलासा मिळत गणेश चतुर्थी दरम्यान एकूण प्रवासाचा त्यांचा अनुभव सुधारेल," असंही राणेंनी स्पष्ट केलं. तेव्हा आता या उपक्रमावर प्रत्यक्षात कधी काम सुरू होतं आणि यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांना ही खास भेट देण्यात महाराष्ट्र शासन यशस्वी ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More
LIVE|
LES
102/9(20 ov)
|
VS |
BOT
92/7(19 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
LES
(20 ov) 81/8
|
VS |
BOT
83/4(12.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(19 ov) 131/7
|
VS |
BRN
135/3(17.1 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 7 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.