पुण्यातुन मुंबईला जाण्यासाठी सर्वात मोठा पर्याची मार्ग; शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण ‘मल्टिनोडल काॅरिडाॅर’मोठी अपडेट

पुण्यातुन मुंबईला जाण्यासाठी सर्वात मोठा पर्याची मार्ग उभारला जाणार आहे.  शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण ‘मल्टिनोडल काॅरिडाॅर’मोठी अपडेट समोर आली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 8, 2025, 08:26 PM IST
पुण्यातुन मुंबईला जाण्यासाठी सर्वात मोठा पर्याची मार्ग; शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण ‘मल्टिनोडल काॅरिडाॅर’मोठी अपडेट

Shirur Chakan Talegaon Karjat Uran Marg : पुण्यातुन मुंबईला जाण्यासाठी सर्वात मोठा पर्याची मार्ग उभारला जाणार आहे.  पुणे, पिंपरी-चिंचवडसह नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण असा नवा पर्याटी मार्ग उभारला जाणार आहे.  शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण मार्गाबबात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबात सूचना केल्या आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण या नव्या प्रस्तावित मार्गाला गती मिळण्याची शक्यता आहे. या मार्गासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याची सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. शिक्रापूर-चाकण-तळेगाव-लोणावळा मार्गावरील मोठ्या प्रमाणावरच्या औद्योगिक क्षेत्रामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुकीचा ताण असतो. त्यामुळे हा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. 

या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाड्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरूर-खेड मार्गे थेट कर्जतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा मार्ग कागदावरच राहिला होता. या मार्गासंदर्भात उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी यासंदर्भात प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

 शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण मार्ग हा ‘मल्टिनोडल काॅरिडाॅर’ म्हणून हा मार्ग ओळखला जाणार आहे. हा महामर्गा चार लेनचा असणार आहे. 135 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. 12500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे प्रवासाचा कालावधी आणि वाहतूक खर्चही कमी होणार आहे. या महामार्गाचे काम बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर केले जाणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीची समस्या 80 टक्क्यांनी कमी होईल, असा दावाही करण्यात येत आहे.

या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 60 किलोमीटर मार्गाचे काम केले जाणार आहे. तर, उरव्रीत दुसरा आणि शेवटचा टप्पा 75 किमी लांबीचा असणार आहे. शिरूर, तळेगाव आणि कर्जमधील औद्योगिक आणि कृषी व्यापाराला या मार्गामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाची या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर एका वर्षात भूसंपादन करून त्यापुढे दोन ते तीन वर्षांत महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More