महागाईच्या दराचा मागील 5 वर्षात उच्चांक

महागाईच्या दरानं गेल्या पाच वर्षांत उच्चांक गाठला आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 15, 2020, 12:14 AM IST

नवी दिल्ली : महागाईच्या दरानं गेल्या पाच वर्षांत उच्चांक गाठला आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर हा ७.३५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. याआधी जुलै २०१४ या महिन्यात महागाईचा दर ७.३९ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात म्हणजेच मागच्या महिन्यात हा दर ७.३५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. 

२०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्के होता. तर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात हा दर २.११ टक्के इतकाच होता. 

मात्र सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून समोर आलेल्या आकड्यांनुसार गेल्या पाच वर्षांतला उच्चांकी दर महागाईने डिसेंबर महिन्यात गाठला आहे. या मुद्यावर काँग्रेसनं भाजपाला टार्गेट केलंय. गरिबांचं जगणं कठीण झालंय. त्यामुळे पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.