Geographe Bay Swimming: एका 13 वर्षीय ऑस्ट्रेलियन मुलाने धोकादायक शार्क माशांनी भरलेल्या पाण्यात चार किलोमीटर पोहून आपल्या आई आणि दोन लहान भावंडांचे प्राण वाचवले. ही घटना पश्चिम ऑस्ट्रेलियातील क्विंडलप बीचजवळील जिओग्राफ बे येथे घडली. कुटुंब पॅडलबोर्डिंग आणि कायाकिंग करत असताना दुर्घटना घडली होती.
कुटुंबात 47 वर्षीय आई जोआन एपलबी, तिचा 13 वर्षांचा मुलगा ऑस्टिन एपलबी, 12 वर्षांचा धाकटा मुलगा बो आणि 8 वर्षांची मुलगी ग्रेस यांचा समावेश होता. 30 जानेवारी 2026 रोजी पर्थपासून सुमारे 250 किलोमीटर दक्षिणेस असलेल्या क्विंडलप येथे सुट्टीसाठी ते आले होते. सुरुवातीला हवामान शांत वाटत होते, परंतु जोरदार वारे आणि लाटांमुळे त्यांचे पॅडलबोर्ड आणि कायाक (बोट) वाहू लागले. दुपारच्या सुमारास, त्यांचा कायाक उलटला, त्यांचा पॅडल हरवला आणि ते वेगाने समुद्रात वाहू लागले.
ऑस्टिनने मदतीसाठी कयाकच्या सहाय्याने किनारा गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र कायाक पाण्याने भरू लागला आणि तो बुडू लागला. त्याने कायाक सोडून पोहायला सुरुवात केली. तो शार्क माशांनी भरलेल्या पाण्यात सुमारे चार किलोमीटर पोहला. पहिले दोन तास तो लाईफ जॅकेट घालून पोहला, पण त्याला जाणवले की तो त्याची गती कमी करत आहे आणि तो किनाऱ्यावर पोहोचू शकणार नाही, म्हणून त्याने ते काढून टाकले. पुढील दोन तास तो जॅकेटशिवाय पोहला. त्याने ब्रेस्टस्ट्रोक, फ्रीस्टाइल आणि सर्व्हायव्हल बॅकस्ट्रोकसह वेगवेगळ्या शैली वापरल्या.
पोहत असताना, ऑस्टिन स्वतःला प्रेरित करत राहिला. त्याने स्काय न्यूजला सांगितलं की, "मी फक्त म्हणत राहिलो, 'आज नाही, आज नाही, आज नाही. फक्त पोहत राहा, फक्त पोहत राहा.'" चार तासांनंतर, तो किनाऱ्यावर पोहोचला, जिथे तो थकव्यामुळे कोसळला, परंतु नंतर उठला आणि मदत मिळवण्यासाठी दोन किलोमीटर धावला. त्याने संध्याकाळी 6 वाजता अलार्म वाजवला.
एक मोठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली. पश्चिम ऑस्ट्रेलिया वॉटर पोलिस, स्थानिक मरीन रेस्क्यू स्वयंसेवक आणि एक रेस्क्यू हेलिकॉप्टर सहभागी झाले. रात्री 8.30 वाजता हेलिकॉप्टरने आई आणि दोन मुलांना शोधून काढले. ते एका पॅडलबोर्डला चिकटून होते आणि किनाऱ्यापासून सुमारे 14 किलोमीटर दूर वाहून गेले होते. त्यांनी लाईफ जॅकेट घातले होते, ज्यामुळे ते इतके तास जिवंत राहिले. एका स्वयंसेवक मरीन रेस्क्यू बोटीने त्यांना वाचवले आणि किनाऱ्यावर आणले. पॅरामेडिक्सनी त्यांची तपासणी केली. रुग्णालयात दाखल केले आणि नंतर कोणतीही दुखापत न होता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कुटुंबाने बचाव पथकाचे आभार मानले.
नॅचरलिस्ट व्हॉलंटियर मरीन रेस्क्यू ग्रुपचे कमांडर पॉल ब्रेसलँड म्हणाले, "या कुटुंबाचे धाडस, ताकद आणि हिंमत असाधारण होते, विशेषतः त्या लहान मुलाने 4 किलोमीटर पोहून धोक्याची घंटा वाजवली" त्यांनी सांगितले की ऑस्टिनने पहिले दोन तास जॅकेट घालून पोहले आणि नंतर त्याशिवाय पोहत राहिले कारण त्याला वाटले की तो तिथे पोहोचू शकणार नाही.
जिओग्राफ बे येथे नेहमीच शार्कचा धोका असतो. ऑस्ट्रेलियामध्ये अलिकडेच अनेक शार्क हल्ले झाले आहेत, ज्यामुळे अनेक समुद्रकिनारे बंद करण्यात आले आहेत. या घटनेच्या वेळी, पाण्यात शार्कच्या उपस्थितीमुळे जास्त धोका होता. ऑस्टिनच्या शौर्याला सुपरह्युमन म्हटलं जा आहे. त्याची आई जोन म्हणाली की तिच्या मुलाला पोहायला पाठवणं हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
UAE
|
VS |
NEP
|
| Nepal beat United Arab Emirates by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
|
VS |
NED
|
| Zimbabwe beat Netherlands by 29 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SL-A
|
VS |
OMA
|
| Oman beat Sri Lanka A by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.