एका माशीमुळे 170000000 रुपये जिंकले! भर मैदानात असे काही घडले की सगळे आश्चर्यचकित झाले

एका माशीमुळे खेळाडूचे नशीब पालटले आणि त्याने 17 कोटींचे बक्षिस जिंकले. खेळाच्या मैदानात चमत्कार घडला. 

वनिता कांबळे | Updated: Aug 31, 2025, 12:28 PM IST
एका माशीमुळे 170000000 रुपये जिंकले! भर मैदानात असे काही घडले की सगळे आश्चर्यचकित झाले

Dony Paul  VIRAL VIDEO : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात की तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे  फार कठिण असते. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यामुळे सर्वच लोक अवाक झाले आहेत. गोल्फ मैदानात करोडोंचा खेळ सुरू होता, खेळाडूने शेवटचा शॉट खेळला आणि नंतर नशिबाने असा वळण घेतला की सगळेच थक्क झाले. एका माशीमुळे या खेळाडूने 17 कोटींचे बक्षिस जिंकले आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती गोल्फ खेळताना दिसत आहे. स्पर्धा जिंकणाऱ्या 17 कोटींचे बक्षिस होते. व्हिडिओमध्ये असे दिसते की जेव्हा खेळाडू शेवटचा शॉट खेळतो तेव्हा त्याचा चेंडू खूप दूर जातो आणि थेट छिद्राजवळ थांबतो. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्व लोक स्तब्ध होतात कारण चेंडूचा अर्धा भाग छिद्रात लटकलेला असतो आणि अर्धा बाहेर जमिनीवर असतो. नेमकं यावेळीच असं काही घडते की कुणी कल्पनाही केली नसेल. 

बॉल छिद्राजवळ लटकला असताना एक माशी चेंडूवर बसते आणइ चेंडू लगेच छिद्रात पडतो. नंतर कॅमेरा झूम केला तर हा पराक्रम स्पष्टपणे दिसतो ज्यामध्ये माशी चेंडू छिद्रात ढकलताना दिसते. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक स्तब्ध झाले आहेत आणि म्हणत आहेत की ती माशी नव्हती तर देवाने पाठवलेली देवदूत होती. जेव्हा नशीब कृपाळू असते तेव्हा माणूस आपोआपच कुस्तीगीर बनतो.

हा व्हिडिओ डोनी पॉल नावाच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अनेकजण या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले... भाऊ भाग्यवान आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले... देव देखील खेळाडूंना पाठिंबा देतो, त्यांच्यात फक्त जिंकण्याची आवड असणे आवश्यक आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले... तो माशी नव्हता तर देवाने पाठवलेला देवदूत होता.च्या नजरा त्या चेंडूवर खिळलेल्या असतात की तो आत पडेल की नाही. मग अचानक एक चमत्कार घडतो आणि एक माशी उडत येते आणि त्या चेंडूवर बसते.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More