36 लेन तरीही 1 इंच सरकल्या नाहीत गाड्या; 80 लाख कार एकाच ठिकाणी...जगातील सर्वात मोठं ट्रॅफिक जॅमचा Video Viral

Longest Traffic Jam : मुंबई, बंगळुरू असो या दिल्ली, यांच्यासाठी ट्रॅफिक जॅम ही काही नवीन गोष्ट नाही. पण इतिहासातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅमची घटना समोर आली आहे. 80 लाख कार एकाच ठिकाणी उभ्या असल्याचा हा व्हिडीओ सर्वांचे अचंबित करत आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 12, 2025, 04:03 PM IST
36 लेन तरीही 1 इंच सरकल्या नाहीत गाड्या; 80 लाख कार एकाच ठिकाणी...जगातील सर्वात मोठं ट्रॅफिक जॅमचा Video Viral

Longest Traffic Jam in China : लॉग विकेंड असला की दिवाळी, होळीचा सण, लोक गावाकडे निघतात तेव्हा त्यांना तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबईतून जेव्हा लोक होळीसाठी गावाकडे निघतात त्यांच्यासाठी वाहतूक कोंडी काही नवीन नाही. तर मुंबई शहरातील वाहतूक कोंडीबद्दल बोलायचं झालं तर त्यामुळे अनेकांना रेल्वे किंवा विमान प्रवासाला मुकावं लागलंय. या वाहतूक कोंडीचा अनेकांना कधी ना कधी फटका बसला आहे. भारतात प्रमुख शहरं मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली या शहरांमध्ये वाहतूक कोंडी ही नेहमीचीच आहे. पण इतिहासातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Add Zee News as a Preferred Source

36 लेन तरीही 1 इंच सरकल्या नाहीत गाड्या; 80 लाख कार एकाच ठिकाणी...

इतिहासातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅमचा व्हिडीओ पाहून नेटकरी अचंबित झाले आहेत. रस्त्यावर 36 लेन होत्या पण तरीही एकही कार एक इंचही जागेवरून पुढे सरकली नाही. या कार 24-24 तास एकाच जागेवर उभ्या होत्या. या वाहतूक कोंडीमध्ये तब्बल 80 लाख कार एकाच जागेवर उभ्या होत्या.

हा व्हिडीओ DailyMail या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर उभ्या असलेल्या हजारो गाड्या....एक लांबच लांब लाल रंगाची पट्टी तुम्हाला पाहिला मिळले, जी मुंगीच्या गतीने पुढे सरकत असल्याच तुम्ही पाहत असाल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Daily Mail (@dailymail)

इतिहासातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम कुठे आणि का झाला?

इतिहासातील आणि जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम हा चीनमधील अन्हुई प्रांतातील Wuzhuang Toll नाक्यावर झाला होता. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वाहतूक कोंडी मागील कारण म्हणजे चीनमध्येगोल्डन वीकसाजरा करण्यात येतो. आपल्याला जशी दिवाळीची सुट्टी असते तशीच चीनमध्येही गोल्डन वीकअसतो. जो 1 ऑक्टोबरपासून शुरु झाला आहे. यात लोकांना 7 दिवसांची सुट्टी असती. त्यामुळे लोक या सुट्टीची मजा घेण्यासाठी घराबाहेर पडतात. याचा फटका म्हणजे या लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. चीनमधील लोक या वाहतूक कोंडीसाठी तयार असतात.

1 ऑक्टोबर 1949 साली चीनमध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापन करण्यात आली होती. या दिवसाच्या स्मरणार्थ चिनी लोक संपूर्ण आठवडा एखाद्या सणाप्रमाणे साजरा करत असतात. 1 ऑक्टोबरपासून सरकारी ऑफिससह खासगी कंपन्यांही कर्मचाऱ्यांना सुट्टी देतात. त्यामुळे या गोल्डन वीकची चीन लोक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात

FAQ

प्रश्न 1: हा व्हायरल व्हिडिओ कशाबाबत आहे?

उत्तर: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ इतिहासातील सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीचा आहे. रस्त्यावर ३६ लेन असूनही गाड्या एक इंचही सरकल्या नाहीत. २४ तास गाड्या एकाच जागेवर उभ्या राहिल्या आणि तब्बल ८० लाख गाड्या अडकल्या. हा व्हिडिओ डेली मेलच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झाला.

प्रश्न 2: ही वाहतूक कोंडी कुठे आणि कधी झाली?

उत्तर: ही जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी चीनमधील अन्हुई प्रांतातील वुझुआंग टोल नाक्यावर झाली. ती 'गोल्डन वीक' सुट्टीच्या वेळी घडली, जी १ ऑक्टोबरपासून सुरू होते.

प्रश्न 3: वाहतूक कोंडीचे मुख्य कारण काय?

उत्तर: चीनमध्ये 'गोल्डन वीक' ही ७ दिवसांची सुट्टी असते, जी १ ऑक्टोबरपासून सुरू होते. या सुट्टीत लोक घराबाहेर पडतात आणि प्रवास करतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते. चीन लोक या कोंडीसाठी तयार असतात, कारण ही सुट्टी खूप महत्त्वाची असते.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More