400 पुरुषांसोबत S*x केल्यानंतर Adult स्टार गरोदर; बाळाचे वडील कोण? स्क्रीनशॉटची जगभर चर्चा

Adult Star Announcing Pregnancy: या महिलेची सध्या जगभरात चर्चा असून तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरुन तिच्यावर टीकेची झोड उठल्याचंही पाहायला मिळत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 2, 2026, 04:44 PM IST
400 पुरुषांसोबत S*x केल्यानंतर Adult स्टार गरोदर; बाळाचे वडील कोण? स्क्रीनशॉटची जगभर चर्चा
सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या फोटोने खळबळ (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Adult Star Announcing Pregnancy: जगभरामध्ये सध्या अडल्ट स्टार बोनी ब्लूची जोरदार चर्चा आहे. खरं तर टिया बिलिंगर नाव असलेल्या या 26 वर्षीय तरुणीने ती गरोदर असल्याचा दावा केला आहे. तिने गरोदर असल्याची प्रेगन्सी टेस्ट केल्याचा फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्याहून मोठा गोंधळ असा आहे की तिच्या होणाऱ्या बाळाचं पितृत्व कोणाचं आहे. कारण काही आठवड्यांपूर्वीच 400 पुरुषांसोबत शय्या करण्याचं चॅलेंज बोनी ब्लूने घेतलं होतं आणि ते पूर्ण केल्यानंतर ती गरोदर राहिली असल्याने तिच्या होणाऱ्या मुलाचे वडील कोण हा प्रश्न चर्चेचा विषय ठरतोय.

Add Zee News as a Preferred Source

तिने शेअर केला स्क्रीनशॉट

बोनी ब्लूने प्रेगन्सी टेस्टचा निकाल पॉझिटीव्ह आल्याची पोस्ट करतानाच आपण या बाळाचे वडील कोण आहेत हे ओळखून त्या व्यक्तीला मेसेज केल्याचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे. 'मला आई व्हायला आवडेल' असं तिने या मेसेजमध्ये समोरच्या व्यक्तीला कळवलं आहे. मात्र त्या व्यक्तीने अगदी उद्धट रिप्लाय दिल्याचा दावा बोनी ब्लूने केला आहे.

समोरच्या व्यक्तीने जबाबदारी नाकारली

'आपला या प्रकरणाशी काही संबंध नसून माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करु नको' असं या व्यक्तीने रिप्लाय करुन कळवल्याचा दावा बोनी ब्लूकडून केला जात आहे. ब्रिटनमधील काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बोनी ब्लूच्या या कथित जोडीदाराने देशही सोडला आहे. 

तिच्यावर होतेय टीका

मागील आठवड्याभरापासून सोशल मीडियावर बोनी ब्लूच्या गरोदरपणासंदर्भातील चर्चा आणि तिनेच केलेली पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर बोनी ब्लूने 400 पुरुषांसोबत केलेली शय्या आणि त्यामधून जन्माला येणाऱ्या बाळाचं पालकत्व कोण स्वीकारणार यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. ज्या प्रकारची बोनी ब्लूची वागणूक आहे ती पाहता तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाला वडिलांचं प्रेम मिळणारच नाही अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे. तर काहींनी हे बाळ जन्माला येण्याआधीच त्याची जबाबदारी घेण्यास कोणताही पुरुष तयार नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. काहींनी तर पालक म्हणून बोनी ब्लू बाळ जन्माला येण्याआधीच नापास झाल्याचा शेराही मारला आहे.

12 तासात हजार पुरुषांसोबत संबंध ठेवल्याचा दावा

बोनी ब्लूचा जन्म 1999 इंग्लंडमधील नॉटिंगहॅमशायर येथील स्टॅपलफोर्डमध्ये झाला. बोनी पाश्चिमात्य देशांमध्ये अडल्ट स्टार म्हणून ओळखली जाते. ती खरं तर ओन्लीफॅन्स आणि फॅन्सली सारख्या अडल्ट प्लॅटफॉर्म्सवर प्रौढांसाठीच्या कंटेंटसाठी ओळखली जाते. यामधून तिने लाखो रुपये कमावते. अनेकदा तिने प्रसिद्धीसाठी वेगवेगळे दावे केले असून यापैकीच सर्वाधिक चर्चेत राहिलेला दावा हा एका दिवसात तिने एक हजारांपेक्षा अधिक पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचं म्हटलेलं. या दाव्यानंतरच तिच्यावर '100 मेन अँड मी: द बोनी ब्लू स्टोरी' नावाचा डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More