Viral News : 19 वर्षांनी पती -पत्नी एकमेकांना कंटाळले, त्यानंतर बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत एकाच घरात...

Viral News :एका लग्नाची विचित्र गोष्ट समोर आली आहे. 19 वर्षांच्या संसार असताना पती - पत्नी एकमेकांना कंटाळली. आयुष्यात उत्साह असावा म्हणून यांनी चक्क एकाच घरात बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत राहण्याचा निर्णय घेतला. काय ही भानगड जाणून घेऊयात. 

नेहा चौधरी | Updated: May 19, 2025, 05:07 PM IST
Viral News : 19 वर्षांनी पती -पत्नी एकमेकांना कंटाळले, त्यानंतर बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत एकाच घरात...

Viral News : नातं आणि लग्न याच्याकडे पाहण्याचा दुष्टीकोन गेल्या काही वर्षांमध्ये खूप बदला आहे. पूर्वी नात्यामध्ये ओलावा, जिव्हाळा आणि एकनिष्ठा होता. पण हल्ली तरुणी पिढी विवाहबंधनात अडकण्यासाठी मागेपुढे पाहतात. त्यांना कुठल्याही प्रकारेची जबाबदारी किंवा बंधन नको आहेत. तर काही लोक कारणं काही असो विवाहबाह्य संबंधांमध्ये अडकतात. वर्षांनुवर्ष एकत्र संसार केल्यानंतर आज आपण पाहतोय, त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊन ते संपुष्टात येत आहे. 

आता एक नवीन प्रकारचा ट्रेंड सुरू झाला आहे. परदेशात, पती-पत्नी एकमेकांच्या परवानगीने प्रेमसंबंध ठेवतात आणि लग्नानंतरही गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड त्यांना असतात. ब्राझीलच्या एका कुटुंबानेही असंच काहीसे केलं, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेसुद्धा वाचा - Viral News : लिव्ह - इन रिलेशनशिपमध्ये राहिला, मुलं झाली; आता एकाच मंडपात 2 महिलांशी करणार लग्न, नेमकं काय आहे प्रकरण?

41 वर्षीय केल मॅसेटारे आणि तिचा 42 वर्षीय पती ब्रुनो कॉर्डिस्को ब्राझीलमधील फ्लोरियानोपोलिस इथे राहतात. संसाराला 19 वर्ष झाल्यानंतर त्यांचा संसार असा टप्प्याला पोहोचला की, ते आता एकमेकांसोबत कंटाळले आहेत. अशात त्यांनी आयुष्यात उत्साह आणण्यासाठी एक विचित्र मार्ग निवडला. 

न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मॅसेटारे आणि ब्रुनो कॉर्डिस्को यांची भेट हायस्कूलमध्ये झाली होती. दोघांनाही प्रेम पडले अन् लग्न केलं. त्यांना दोन मुलं असून, 19 वर्षांचा हेन्री आणि 13 वर्षांचा हेक्टर. आज त्यांच्या लग्नाला 19 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि आता परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की दोघेही एकमेकांच्या सहवासाचा कंटाळली आहेत. आयुष्यात उत्साह आणण्यासाठी त्यांनी एक विचित्र मार्ग निवडला आहे. 

हेसुद्धा वाचा - ठणठणीत असताना ती' अचानक बेशुद्ध पडली, डॉक्टरने टेस्ट केल्यावर कळलं, 'तिच्याजवळ फक्त...'

ओपन मॅरेजची संकल्पना!

बहुविवाहाची संकल्पना स्वीकारण्याचा विचार केला. नातेसंबंधाच्या या संकल्पनेद्वारे, एखादी व्यक्ती त्याच्या जोडीदाराच्या मान्यतेने अनेक प्रेमसंबंधांमध्ये राहते आणि या नात्यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही यात कोणतीही अडचण येत नाही. दोघांनीही बाहेर स्वतःसाठी जोडीदार शोधतात. केल म्हणाली की सुरुवातीला ती अशा नात्यासाठी तयार नव्हती आणि तिला वाटलं की तिनं तिचं लग्न संपवावं. पण सर्व काही परस्पर संमतीने आणि परस्पर आदर राखून घडले. आता ते चौघेही दोन मुलांसह एकाच घरात राहतात.

केल डिएगो मचाडो नावाच्या पुरुषाला डेट करत आहे, तर ब्रुनो जेनिफर डी फारिया नावाच्या महिलेला डेट करत आहे. दिएगो त्या जोडप्यासोबत त्यांच्या घरी राहतो, तर जेनिफर आठवड्याच्या शेवटी त्यांच्यासोबत राहण्यासाठी येते. दोन्ही जोडप्यांसाठी स्वतंत्र बेडरूम आहेत. घरातील कामात सर्वजण एकत्र मदत करतात. कोणी अन्न शिजवतं, कोणी साफसफाई करतं, कोणी किराणा सामान खरेदी करतो आणि आणतो. जेव्हा मुलांचा विचार येतो तेव्हा ते त्यांच्यासाठी एकत्रितपणे निर्णय घेतात. या जोडप्याचे म्हणणे आहे की, बाहेरील लोक त्यांचं नातं समजू शकत नाहीत, पण ते या सेटअपमुळे खूप आनंदी आहेत.