)
Malaysian Husband Affair : एक महिला आपलं संपूर्ण आयुष्य पती आणि संसारासाठी व्यथित करते. पण जेव्हा पती तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतो अन् अनैतिक संबंधात अडकतो तेव्हा. असंच काहीस या महिलेसोबत झालं आहे. महिलेला तिच्या नवऱ्याने तब्बल 9 वर्ष फसवलं. या नऊ वर्षात त्याचे अनैतिक संबंध होते. पण हा सगळा प्रकार तेव्हा लक्षात आला जेव्हा तो पती मृत्यूच्या दारी होता.
पतीला हॉर्ट अटॅकचा स्ट्रोक आला. तेव्हा पत्नीने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. यावेळी पत्नीने आणि मुलांनी धावपळ करुन जीव वाचवला. पण ही गोष्ट तेव्हा घडली जेव्हा महिलेला आपल्या पतीचं नऊ वर्षाचं अफेअर समोर आलं. या सगळ्या दरम्यान पत्नीने आपल्या पतीच्या अनैतिक संबंध आणि तो काळ उघड केला.
पत्नीने खुलासा केला की, ही गोष्ट समोर आली तेव्हाचा धक्का खूप मोठा होता. पत्नीची प्रियसीच नाही तर तिच्यासाठी घेऊन दिलेलं घर, कार आणि महागडे गिफ्ट देखील समोर आले. हे ऐकल्यानंतर ती महिला मोडून पडली नाही तर तिने खंबीरपणे या प्रसंगाला सामोरं जायचं ठरवलं. पत्नी थेट प्रेमिकेच्या घरी गेली. प्रेमिका तेव्हा लाजिरवाण्या नजरेने सामोरे गेली. यानंतर पत्नीने शांत राहायचं नाही आपण आता बोलायचं असं ठरवलं.
मागे वळून पाहताना, पत्नी म्हणाली की तिच्या श्रद्धेने तिला धैर्य दिले. तिचा असा विश्वास आहे की कोणताही विश्वासघात परिणामांशिवाय नसतो. नऊ वर्षांच्या दुःखानंतर, जेव्हा तिच्या पतीने सर्वस्व गमावले, तेव्हा तो पत्नी आणि मुलांसह राहिला ज्यांच्यावर त्याने सर्वात जास्त अन्याय केला होता.
या घटनेने सिद्ध केले की आयुष्यातील प्रत्येक कर्माचं फळ त्याला मिळतं. नऊ वर्षे आपल्या पत्नीचा विश्वासघात करणारा माणूस शेवटी त्याच्या कुटुंबावर अवलंबून राहिला. ज्या पत्नीला त्याने सर्वात जास्त दुखावले ती पत्नी आणि मुले आता त्याचा शेवटचा आधार आणि काळजीचा स्रोत आहेत. ही कथा केवळ विश्वासघात आणि वेदनांबद्दल नाही तर न्याय आणि नशिबाच्या खेळाबद्दल देखील आहे. पत्नीने वर्षानुवर्षे शांतपणे सहन केले, परंतु परिस्थितीने शेवटी तिला सत्याचा सामना करण्यास भाग पाडले. आणि पतीसाठी, त्याच्या कृतींचा हा खरा परिणाम होता.