अमेरिकेत फायझर 'लस'ची अनेकांना अॅलर्जी

अमेरिकेत आपत्कालीन वापरासाठी देण्यात आलेल्या फायझरच्या 'लस'ची (Pfizer vaccine)  अनेकांना अॅलर्जी झाली आहे.  

Updated: Dec 26, 2020, 07:59 AM IST
अमेरिकेत फायझर 'लस'ची अनेकांना अॅलर्जी  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत ( USA) आपत्कालीन वापरासाठी देण्यात आलेल्या फायझरच्या 'लस'ची (Pfizer vaccine)  अनेकांना अॅलर्जी झाली आहे. (Allergic reactions to Pfizer’s coronavirus vaccine) सध्या अमेरिकेत (US) आपत्कालीन वापरासाठी फायझरच्या 'लस'ला  ( Pfizer coronavirus vaccine) मान्यता देण्यात आली आहे. मात्र, इपीपेन नावाचे औषध वापरणाऱ्या लोकांना ही अॅलर्जी झाल्याचे दिसून येत आहे. 

फायझर कोरोना व्हॅक्सिनला परवानगी

हे औषध अशा लोकांना दिले जाते जे जास्तकरुन अॅलर्जीमुळे त्रासलेले ( (Allergic Reactions) असतात. याआधी ब्रिटनमध्येही दोन जणांनी फायझर लस घेतल्यानंतर अॅलर्जीचा जास्त त्रास झाल्याची तक्रार केली होती. यामुळे डॉक्टर्स आणि संशोधकांची चिंता वाढली आहे.

न्यूयॉर्क शहरात आतापर्यंत ३० हजार लोकांना या 'लस'चा डोस देण्यात आला आहे. फायझर 'लस'ची आणखी एक अडचण अशी आहे की, या लशीला-७० डिग्री सेल्सियसमध्येच स्टोअर करुन ठेवावे लागते. तर मॉडर्नाच्या लशीसाठी-२० डिग्री सेल्सियस तापमानाची गरज असते.

फायझरच्या (Pfizer)  'लस'ला ( Covid Vaccine) अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या औषध विभागाने (एफडीए) फाइजरला तातडीने फायझर  (Pfizer COVID-19 Vaccine) लस वापरण्यास मान्यता दिली.  अमेरिकन नागरिकांना लस दिली जात आहे. आता एक मोठी समस्या समोर आली आहे.  

कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ९२ हजार नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना लसीकरण धोरणाला प्राधान्य दिले होते. त्यांनी स्वत: लस टोचून घेतली आहे.  सुरूवातीला सुमारे २० लाख आरोग्य सेवक आणि वयोवृद्ध नागरिकांना 'लस'साठी प्राधान्य दिले जाणार आहे, असे अमेरिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.