अंतराळातून दिसला ऑरोरा लाईट्सचा अद्भुत नजारा! NASA अंतराळवीर जोनी किमने टिपला मंत्रमुग्ध करणारा Video

NASA astronaut Jonny Kim captures mesmerizing video:  नासाचे अंतराळवीर जोनाथन योंग जॉनी किम यांनी अवकाशातून अरोरा लाईट्सचा एक अद्भुत नजारा टिपला. 

तेजश्री गायकवाड | Updated: Jun 9, 2025, 12:33 PM IST
अंतराळातून दिसला ऑरोरा लाईट्सचा अद्भुत नजारा! NASA अंतराळवीर जोनी किमने टिपला मंत्रमुग्ध करणारा Video
NASA astronaut captures aurora lights

 NASA  Aurora lights Viral Video: नासाचा ( NASA)  अंतराळवीर जोनाथन योंग जॉनी किम याने नुकताच एक अपूर्व नजारा कॅमेऱ्यात बंदिस्त केला आहे. जोनीने अंतराळातून पृथ्वीवरील ऑरोरा लाईट्सचा टाइम-लॅप्स मोडमध्ये व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर करताच प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शुक्रवारी शेअर करण्यात आला असून, यामध्ये पृथ्वीचा भाग वरून कसा दिसतो ते दिसते. याशिवाय दक्षिण आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या वरच्या बाजूला बघायला मिळणाऱ्या रंगीबेरंगी ऑरोरा लाईट्सची जादू पाहायला मिळते. सुरूवातीला एक हिरवट प्रकाश आकाशात पसरताना दिसतो आणि नंतर त्यात लाल आणि जांभळ्या रंगाची छटाही बघायला मिळते. 

पहिलाच अनुभव, पण आयुष्यभर लक्षात राहणारा 

“माझा पहिला ऑरोरा कॅप्चर केला.” या भावनिक शब्दात जोनी किमने या पोस्टची सुरुवात केली आहे. पुढे तो म्हणतो, “हा संपूर्ण अनुभव एखाद्या मासेमारीसारखं वाटलं. कॅमेरा सेट करणं,  अँगल शोधणं, सेटिंग्ज करणं,  माउंट तयार करणे, सगळं जुळवून टाइमर लावणं आणि मग काही मिळतंय का यासाठी परत येणं. जसं पहिला मासा पकडल्यानंतर माणूस वेडा होतो, तसंच काहीसं माझं झालंय!”

सह अंतराळवीर मानले आभार 

किमने त्याच्या सहकारी अंतराळवीर निकोल एयर्सचे विशेष आभार मानले आहेत. निकोल एयर्सनेच त्याला टाइम-लॅप्स कसा तयार करायचा हे शिकवलं. विशेष म्हणजे, निकोल एयर्स ही अंतराळातून ऑरोरा लाईट्सचे फोटो आणि व्हिडीओ नियमितपणे सोशल मीडिया  'X' वर शेअर करत असते.

यावर्षीचं पहिलं स्पेस मिशन

किम 2017 मध्ये NASA चा अधिकृत अंतराळवीर म्हणून निवडला गेला. यावर्षी 8 एप्रिल रोजी रशियन सोयुझ रॉकेटमधून त्याने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) मोहिमेसाठी प्रस्थान केलं. अंतराळात जाण्यापूर्वी तो 2002 पासून अमेरिकन लष्करात विविध पदांवर कार्यरत होता.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jonny Kim (@jonnykimusa)

आंतराळातून टिपलेला हा नजारा फक्त टेक्निकल कमाल नाही, तर निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याची आठवण करून देणारा एक मंत्रमुग्ध करणारा क्षणही ठरतोय.