)
America Charlie Kirk Shot Dead: जागतिक राजकारणामध्ये सातत्यानं काही महत्त्वाच्या कारणांनी चर्चेचा विषय ठरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशात एक जबर हादरा बसला आहे. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेमध्ये उजव्या विचारसरणीचे नेते आणि 'टर्निंग पॉईंट युएसए'चे अध्यक्ष चार्ली किर्क अर्थात ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांची हत्या करण्यात आली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडून ही हत्या करणअयात आली.
10 सप्टेंबर 2025 रोजी युटा वॅली युनिवर्सिटी इथं किर्क एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिथं त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला आणि यातच त्यांचे प्राण गमावले. चार्ली यांची हत्या होणं हा ट्रम्प यांच्यासाठी एक मोठा धक्का समजला जात असून, राष्ट्राध्यक्षांच्या काही मोजक्या निकटवर्तीयांमध्ये किर्क यांचंही नाव घेतलं जात होतं. अमेरिकेतील युवा मतदारांवर त्यांचा असणारा प्रभाव पाहता ट्रम्प यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये किर्क यांची महत्त्वाची भूमिका नाकारता येत नाही. किंबहुना नव्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पर्वासाठीसुद्धा किर्क यांनी ट्रम्प यांना बरीच मदत केली होती. ज्यामुळं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर परिणाम करणारी ही मोठी घटना समजली जात आहे. दरम्यान या खळबळजनक घटनेनंतर अमेरिकेत एफबीआय (FBI) नं एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
Once again, a bullet has silenced the most eloquent truth teller of an era. My dear friend Charlie Kirk was our country's relentless and courageous crusader for free speech. We pray for Erika and the children. Charlie is already in paradise with the angels. We ask his prayers for… pic.twitter.com/ReOdkT6VbV
— Robert F. Kennedy Jr (@RobertKennedyJr) September 10, 2025
अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे नेते चार्ली किर्क या देशातील अशा प्रभावी व्यक्तीमत्त्वांपैकी एक होते ज्यांनी रिपब्लिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय हेतू पुढं नेण्यास हातभार लावला, मोठ्या संख्येनं तरुणाईला प्रभावित केलं. किर्क हे मुळचे इलिनोईसचे रहिवासी असून, वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी राइट विंग छात्र समूह टर्निंग पॉइंट यूएसएची स्थापना करण्यात हातभार लावला होता. पुढे ट्रम्प यांच्या शासनकाळात त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. दरम्यान बुधवारी एका परदेशी भाषण दौऱ्याहून परतल्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. किर्क 31 वर्षांचे होते.
किर्क यांच्यावर हा हल्ला तेव्हा झाला, ज्यावेळी ते युटातील ओरेम स्थित युटा वॅली विश्वविद्यालय परिसरामध्ये मोठ्या जनसमुदायाला संबोधित करत होते. ट्रम्प यांचे खंदे समर्थक असल्या कारणानं त्यांची अमेरिकेत प्रचंड लोकप्रियता होती. 2024 मध्ये ट्रम्प यांच्या गटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. इस्रायलशी त्यांचं असणारं नातं पाहता या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांना 'इस्रायलचा सिंहाचं काळीज असणारा मित्र' म्हणूनही संबोधलं होतं.
10 सप्टेंबर रोजी जेव्हा युटा वॅली विद्यापीठात एका ओपन फोरममध्ये किर्क सहभागी झाले तेव्हा ते 'मास शूटींग्स' संदर्भातील प्रश्नावर उत्तर देत होते. त्याचवेळी गोळी लागल्यानं तिथं असणाऱ्या खुर्चीवर ते कोसळले. प्रत्यक्षदर्शींनुसार हा हल्ला सर्वांसमक्ष झाला आणि घटनास्थळी एकच अफरातफरी माजली. किर्क यांना तातडीनं नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. युटा डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार घटनास्थळी केवळ एक गोळी चालली आणि निशाण्यार किर्कच होते. या घटनेनंतर तातडीनं हे घटनास्थळ रिकामं करण्यात आलं आणि विद्यापीठातील वेळापत्रक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. किर्क यांच्यावरील हा हल्ला पाहया युटाचे गव्हर्नर स्पेंसर कॉक्स यांनी ही 'हत्या' असून हा अमेरिकी लोकशाहीवर झालेला हल्ला आहे अशा शब्दांत प्रतिक्रिया देत या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
चार्ली किर्क कोण होते?
चार्ली किर्क हे अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे नेते आणि 'टर्निंग पॉइंट युएसए' या रूढीवादी युवा संघटनेचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि प्रभावी समर्थक होते. त्यांनी अमेरिकेतील युवा मतदारांना प्रभावित करण्यात आणि ट्रम्प यांच्या राजकीय उद्दिष्टांना पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
चार्ली किर्क यांची हत्या कुठे आणि कधी झाली?
चार्ली किर्क यांची हत्या 10 सप्टेंबर 2025 रोजी युटा व्हॅली विद्यापीठात (ओरेम, युटा) एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान झाली. ते 'द अमेरिकन कमबॅक टूर' या टर्निंग पॉइंट युएसएच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.
हत्या कशी घडली?
किर्क हे युटा व्हॅली विद्यापीठातील एका खुल्या मंचावर (ओपन फोरम) बोलत होते आणि 'मास शूटींग्स' (सामूहिक गोळीबार) या विषयावरील प्रश्नाला उत्तर देत होते. त्याचवेळी, लॉसी सेंटरच्या छतावरून सुमारे 200 यार्ड अंतरावरून एका गोळीने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.