India Afghanistan News: भारतानं पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत या देशाला दहशतवादाला खतपाणी न घालण्याचा स्पष्ट इशारा दिला. ज्यानंतर अनेक संकटांचा सामना करणाऱ्या भारताच्या या शत्रू राष्ट्राला आता पश्चिमी सीमाभागातून होणाऱ्या विरोधाचीही कुणकुण लागली आहे. भारता आणि अफगाणिस्तान किंवा तिथं सत्तेत असणाऱ्या तालिबानमधील कमी होणारा दुरावा पाकिस्तानच्या चिंचेच भर टाकत असून, त्यामुळं थेट इस्लामाबादपर्यंत पाकला हादरा बसला आहे.
तालिबानकडून पाकिस्तानच्या भारतविरोधी भूमिकेवर निशाणा साधण्यात आला असून, इथून पुढं तालिबानचा एखाद्या शस्त्राप्रमाणं वापर करण्याचा मनसुबा पाकिस्ताननं आता सोडून द्यावा असा स्पष्ट इशाचा अफगाणिस्तानातून देण्यात आला आहे. दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही तालिबानच्या मंत्र्यांशी संवाद साधल्यामुळं जागतिक स्तरावर या घडामोडीनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
दक्षिण आशियाई राजनैतिक समीकरणांमध्ये हा एक नवा अध्याय समजला जात आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहिल्यांदाच तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अधिकृत संवाद साधला. हा संवाद ऐतिहासिक असून, भारताने तालिबान प्रशासनाशी केलेला हा पहिला मंत्रीस्तरीय संपर्क आहे, जो बदलत्या भू-राजनैतिक परिस्थितीचे स्पष्ट संकेत देतो, असंही या संवादानंतर म्हटलं गेलं.
भारत आणि तालिबानच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या या संवादानंतर जुने दिवस आता सरले असून, पाकिस्तान आणि त्यांचं सैन्य भारतविरोधी भूमिकांसाठी तालिबानचा वापर करू शकत नाहीत असा स्पष्ट संदेश देण्यात आला. ज्यामुळं थेट पाकिस्तानच्या तख्तापर्यंत हादरा बसल्याचंही स्पष्ट झालं.
Good conversation with Acting Afghan Foreign Minister Mawlawi Amir Khan Muttaqi this evening.
Deeply appreciate his condemnation of the Pahalgam terrorist attack.
Welcomed his firm rejection of recent attempts to create distrust between India and Afghanistan through false and…
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 15, 2025
गुरुवारीच जयशंकर यांनी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. हे संभाषण अशा वेळी आणि अशा परिस्थितीत झालं जेव्हा अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यात पाकिस्तान-समर्थित दहशतवाद्यांनी 26 पर्यटक नागरिकांचा बळी घेतला होता, ज्यानंतरच पाकिस्तानला धडा शिकवत दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारलीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर ही मोहिम राबवत 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले होते.