'मातीतलं सोनं...'; उत्खननात असं काही दिसलं, की संशोधक आनंदाच्या भरात किंचाळलेच! हा तुकडा इतका महत्त्वाचा का?

World News : उत्खननाच्या माध्यमातून गतकाळात घडलेल्या घडामोडी, त्या काळातील जगणं आणि तत्सम अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो. यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे...   

सायली पाटील | Updated: Nov 14, 2025, 04:21 PM IST
'मातीतलं सोनं...'; उत्खननात असं काही दिसलं, की संशोधक आनंदाच्या भरात किंचाळलेच! हा तुकडा इतका महत्त्वाचा का?
Archaeologists big revelation Jerusalem 2700 year old Pottery fragment found Assyrian inscription

World News : असं म्हणतात, की कोणतीही गोष्ट असो पण, ती जेव्हा पहिल्यांदाच घडत असते तेव्हा तिचं महत्त्वं काही औरच असतं. अशाच एका रहस्याचा उलगडा नुकताच संशोधकांच्या एका चमूनं केला असून, मातीच्या दुर्लक्षित ढिगाऱ्यातून त्यांनी काही अशा गोष्टी मिळवल्या आहेत, ज्या सोन्याहून कमी नाही. म्हणूनच की काय या वस्तू हाताशी लागताच उत्खननादरम्यान आनंदाच्या भरात पुरातत्त्वं विभागाच्या मंडळींनी किंकाळीच फोडली. 

Add Zee News as a Preferred Source

असं सापडलं तरी काय? 

जेरुसलेम इथं हल्लीच झालेल्या एका उत्खननात पुरातत्त्वं विभागाच्या काही संशोधकांच्या चमूनं Assyrian inscription अर्थात अश्शूर शिलालेखांचे अवशेष हस्तगत केले आहेत. या शिलालेखांचा थेट संबंध बायबलमध्ये असणाऱ्या काही संदर्भांशी जोडण्यात येत आहे. जेरुसलेमच्या पूर्वेला असणाऱ्या Tzurim Valley National Park इथं हे शिलालेखाचे अवशेष सापडले असून, ते एका मातीच्या तुकड्यावर लिहिण्यात आल्याचं उत्खननातून स्पष्ट केलं. या संपूर्ण संशोधनाची माहिती Israel Antiquities Authority (IAA) नं जाहीर केली. 

कुठे मिळाले हे दुर्मिळ अवशेष? 

त्झुरिम खोऱ्यात हे अवशेष सापडले असले तरीही टेंपल माऊंट येथील दक्षिणेकडे असणाऱ्या भिंतीलगत असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यातच ते दडले होते. प्राथमिक माहितीनुसार हे शिलालेखाचे अवशेष असिरियन अर्थात अश्शूर संस्कृतीशी निगडीत असून, मध्यपूर्वेतील हे एक अतिशय प्रभावी साम्राज्य मानलं गेलं होतं. असीरियन साम्राज्यानं मध्यपूर्वेवर इ.स. पूर्व 7 व्या ते 9 व्या शतकादरम्यान साम्राज्य केलं. अधिक सखोल माहितीचा आधार घ्यायचा झाल्यास हा शिलालेख Akkadian लिपीत असून, तो साधारण 2700 वर्षांपूर्वीचा असल्याचा उलगडा होत आहे. 

उत्खननादरम्यान Moria Cohen यांना प्रथम हे अवशेष दिसले आणि त्यावर जमलेली माती दूर केली असता त्यावर विचित्र काहीतरी कोरल्याचं पाहिलं. 'मी अगदी जवळून पाहिलं आणि तो एक पाचरीच्या आकाराचा शिलालेख असल्याचं लक्षात आलं. आम्हाला इथं या पद्धतीचं कधीही काही सापडलं नव्हतं', असं Cohenननं सांगितलं. या तुकड्याला त्यांनी पुन्हा पाहिलं आमि ते सजावटीचं नसून प्रत्यक्षात एका शिलालेखाचाच तुकडा असल्याचं लक्षात येताच एकदाच किंकाळी फोडली. हा तुकडा साधारण 2.5 सेंटीमीटरचा असून, त्या काळातील साम्राज्यांमधील बदलांचा एक कमाल पुरावा ठरत आहे. त्यावर असणाऱ्या संदेशामध्ये कोणत्याही राजाच्या नावाचा उल्लेख नाही. मात्र त्याच्यावरील संदेश पाहता जुडेन राजे  Hezekiah, Manasseh किंवा Josiah साठी पाठवल्याचा तर्क वर्तवण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : कमाल! लादी पुसणारा रोबोट; जागाही कमी व्यापतो आणि तुम्ही इतर कामांमध्ये असताना शांतपणे घर स्वच्छही करतो... 

सदर उत्खननानंतर सापडेलल्या शिलालेख प्रशासकीय आणि राजनितीज्ज्ञ नातेसंबंधांवर भाष्य करणारं असून त्यात असीरीया आणि जुडाह यांच्या कालखंडातील अगदी सुरुवातीचे अवशेष म्हणून पाहिलं जात आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More