खळबळजनक! इकडे अमेरिका-इराण युद्ध थांबलं अन् तिकडे किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने छोट्याश्या देशावर डागलं मिसाईल

North Korea Missile: मध्यपूर्व आशियामध्ये सुरु असलेले अमेरिका आणि इराणमधील एकमेकांवरील हल्ले युद्धबंदीमुळे हळूहळू बंद होत असतानाच आता भारताच्या पूर्वेकडे असलेल्या जपानवर युद्धाचं संकट दिसून येत आहे. नक्की घडलंय काय? जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 8, 2026, 01:38 PM IST
खळबळजनक! इकडे अमेरिका-इराण युद्ध थांबलं अन् तिकडे किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने छोट्याश्या देशावर डागलं मिसाईल
जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने दिली माहिती (प्रातिनिधिक फोटो) (सौजन्य रॉयटर्सवरुन आणि वृत्तसंस्थांकडून साभार)

North Korea Missile: एकीकडे अमेरिका आणि इराण युद्धाची दाहकता दोन आठवड्यांच्या युद्धबंदीमुळे सौम्य झालेली असतानाच दुसरीकडे उत्तर कोरियाने एक संशयित बॅलिस्टिक क्षेपणास्र जपानच्या दिशेने डागल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने सोमवारी एका संशयित बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले, ज्यामुळे जपानच्या अधिकाऱ्यांनी तातडीने इशारा जारी केला आहे. यासंदर्भातील माहिती जपानच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Add Zee News as a Preferred Source

जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने काय म्हटलंय?

"उत्तर कोरियाने एका संशयित बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले आहे. अधिक माहिती लवकरच दिली जाईल," असं जपानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन सांगण्यात आलं आहे. जपानच्या सुरक्षा आणि संरक्षण यंत्रणांच्या हवाल्याने करण्यात आलेल्या या पोस्टमुळे प्रादेशिक स्थिरतेवर लक्ष ठेवून असलेल्या जपानच्या शेजारील देशांनी या घडामोडीची तात्काळ दखल घेतली आहे. 

देशाच्या सुरक्षेसाठी तीन महत्त्वाच्या सूचना

उत्तर कोरियाने अनपेक्षितपणे केलेल्या या प्रक्षेपणानंतर, जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने देशातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक सुरक्षा आणि राष्ट्रीय सज्जतेवर भर देत सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. "उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या प्रतिसादामध्ये पंतप्रधानांच्या सूचना पुढील प्रमाणे आहेत - 1. माहिती गोळा करण्यासाठी आणि तिचे विश्लेषण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि जनतेला वेळेवर व योग्य पद्धतीने माहिती द्या. 2. विमाने, जहाजे आणि इतर मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करा. 3. आकस्मिक परिस्थितीसाठी सज्जतेसह खबरदारीचे सर्व संभाव्य उपाय करा."

या आधीही उत्तर कोरियाने केलेत असे प्रकार

खरं तर उत्तर कोरियाने अशाप्रकारे पहिल्यांदाच चाचणी केलेली नाही. गेल्या दशकात उत्तर कोरियाने वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या असल्या तरी, प्रत्येक प्रक्षेपणामुळे नागरी वस्ती आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांना असलेल्या संभाव्य धोक्यामुळे चिंतेत भर पडली आहे. या चाचण्यांची वेळ आणि सतत्यामुळे अनेकदा अशा चाचण्यांकडे देशाकडून दिल्या जाणारा धोरणात्मक संदेश म्हणून पाहिलं जातं. अशा गोष्टी भू-राजकीय स्थानाशी जवळून निगडित असतात. विशेषतः प्रदेशातील लष्करी कवायती किंवा राजनैतिक दबावांना प्रतिसाद म्हणून अशा चाचण्या घेतल्या जातात.

अमेरिका कनेक्शन चर्चेत

जपान हा पूर्व आशियातील अमेरिकेचा एक प्रमुख मित्रराष्ट्र आहे. अमेरिकेशी असलेली जवळीक लक्ष घेता जपान कायमच अशा चिथावणीखोर कृत्यांविरुद्ध उच्च दक्षता बाळगतो. अधिकारी हवाई आणि सागरी क्षेत्रांना नियमितपणे सूचना जारी करत असतात. नागरिक व महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी आपत्कालीन योजना सक्रिय केल्या जातात. जपानचे स्वसंरक्षण दल उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा मार्ग आणि संभाव्य परिणाम क्षेत्रांवर लक्ष ठेवते, जेणेकरून गरज पडल्यास त्वरित प्रतिसाद देता येईल.

नागरिकांना सरकारकडून इशारा

कोरियाजवळच्या द्वीपकल्पावरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नव्या क्षेपणास्त्राची चाचणी झाली आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय या चाचण्यांनंतर उत्तर कोरियाला त्याच्या शस्त्र कार्यक्रमावर निर्बंध घालणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि संभाव्य प्रतिउपाय निश्चित करण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिका देखील जपानसोबत जवळून समन्वय साधतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. किनारपट्टी आणि उत्तरेकडील भागांतील रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More