CEO Andy Byron issues Public Apology: कोल्डप्ले कॉन्सर्टच्या अमेरिकेतील कॉन्सर्टपेक्षा अधिक चर्चा सध्या एका ‘किस कॅम’ व्हिडीओची सुरू आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बोस्टनमधील कार्यक्रमादरम्यान स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर अचानक एका जोडप्याचा क्लोज-अप दाखवण्यात आला. त्याचा खाजकी क्षण कैमऱ्यात कैद झाला आणि तेव्हा गोंधळ उडाला. त्या दोघांची ओळख समोर आल्यानंतर प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं.
अँडी बायरन (Andy Byron) , Astronomer या कंपनीचे CEO आणि त्यांच्या कंपनीतील HR प्रमुख क्रिस्टिन कॅबोट (Kristin Cabot) दोघेही एकमेकांच्या मिठीत ‘किस कॅम’वर पकडले गेले. या दोघांनी जेंव्हा कॅमेरा आपल्यावर आहे हे पाहिलं, तेंव्हा ते पटकन बाजूला झाले आणि चेहऱ्यावरून हात ठेवून लपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोशल मीडियावर तर्क-वितर्क सुरू झाले की हे अफेयर उघड झालं आहे का?
हे ही वाचा: मोठ्या कंपनीच्या CEO चं HR सोबत अफेअर! कॉन्सर्टदरम्यान स्पॉटलाइट आला अन्... Video Viral
Ese Andy Byron bien fan de #Mentiras pic.twitter.com/pscjGIqg7v
— Paco Vargas (@Paco_Vargas_R) July 18, 2025
या घटनेनंतर एक 'माफीनामा' व्हायरल झाला जो अँडी बायरनचा असल्याचा दावा केला आहे. त्याने म्हटले आहे की, "माझ्या कडून एक मोठी चूक झाली आहे, ज्यामुळे माझ्या पत्नीला, कुटुंबाला आणि कंपनीतील लोकांना दुखावलं आहे. ही माझी जबाबदारी आहे आणि मी स्वतःहून त्यावर विचार करणार आहे." त्यांनी या 'माफीनाम्यात' आणखी असंही म्हटलं की, "ही घटना खासगी असायला हवी होती, पण ती सार्वजनिक झाली. यामुळे खूप वाईट वाटतंय." त्यांच्या या कथित निवेदनात शेवटी कोल्डप्लेच्याच एका गाण्याचा उल्लेख होता, "Lights will guide you home, and ignite your bones, and I will try to fix you."
हे ही वाचा: ‘किस कॅम’ मुळे CEO आणि HR चा खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद, जाणून घ्या हा Kiss Cam प्रकार आहे तरी काय?
या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे अँडी बायरनचा हा माफीनामा खरा नाही. सोशल मीडियावर ज्या अकाऊंटवरून हे स्टेटमेंट शेअर झालं, ते अकाउंट 'पॅरोडी अकाऊंट' असल्याचं X वरील कम्युनिटी नोट्सने (Community Notes) ने स्पष्ट केलं आहे. याचाच अर्थ असा होतो की हा व्हायरल माफीनामा बनावट आहे.
हे ही वाचा: Felix Baumgartner: अंतराळातून उडी मारणाऱ्या फेलिक्स बॉमगार्टनरचा पॅराग्लायडिंगने घेतला जीव!
अँडी बायरन किंवा त्याच्या कंपनीकडून अधिकृतपणे या घटनेवर कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. मात्र कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमधून उगम पावलेलं हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.