Viral News Video : एखाद्या कॉन्सर्टचं दृश्य डोळ्यांसमोर आणण्यास सांगितलं, तर अनेक उदाहरणं आठवतात. प्रचंड मोठं व्यासपीठ, चाहत्यांची तोबा गर्दी, व्यासपीठावर कला सादर करणारे कलाकार वगैरे वगैरे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात अशाच एका कॉन्सर्टची चर्चा सुरू आहे. पण हा कॉन्सर्ट एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेचा विषय ठरत आहे. हा विषय म्हणजे कॉन्सर्टदरम्यान घडलेली एक भयंकर घटना.
फ्रान्समधील प्रसिद्ध बँड 'लुलू वॅन ट्रॅप' (Lulu Van Trapp)ची मुख्य गायिका रेबेका बेबी (Rebecca Baby)च्याच कृतीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून तिनं असं नेमकं का केलं हा प्रश्नसुद्धा अनेकांच्याच मनात घर करत आहे. रेबेका ज्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी गाणं सादर करत होती त्यातीलच काही प्रेक्षकांनी रेबेकाला अश्लील/ आक्षेपार्ह पद्धतीनं स्पर्श केला. या अतिशय घृणास्पद कृतीचा निषेध म्हणून रेबेकानं टोकाचं पाऊल उचललं आणि व्यासपीठावरच कपडे काढले अन् अर्धनग्नावस्थेतच ती गाऊ लागली.
'ले क्रि दे ला गॉटे' नावाच्या एका संगीत महोत्सवामध्ये रेबेका तिली कला सादर करत होती. याचदरम्यान ज्याप्रमाणे अनेक गायक किंवा कलाकार प्रेक्षकांच्या गराड्यात जाऊन गाणं सादर करतात, अगदी तशाच पद्धतीनं रेबेका गाण्यासाठी गेली असता गर्दीतील दोघांनी तिच्यासोबत विकृत कृत्य केलं. यावेळी हात पकडून रेबेकाला चुकीच्या पद्धतीनं स्पष्ट करण्यात आला आणि इथंच तिचा पारा चढला. संतापाच्या भरात गाणं गात असतानाच तिनं व्यासपीठावर जाऊन कपडे काढले.
विनयभंग आणि या अश्लील कृत्याचा निषेध करणाऱ्या रेबेकाच्या धाडसाला अनेक नेटकऱ्यांनी दाद दिली. सोशल मीडियावर तिच्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिनं सोशल मीडियावरूनही व्यक्त होण्याचा मार्ग निवडला. 'लोक चुकीच्या पद्धतीनं पाहणं थांबवणार नाहीत तोवर हे सुरूच राहील. मी स्टेजवर आल्यानंतर एका माणसाला शो शांतपणे सोडून जायला सांगितलं. माझ्यापाशी दोन पर्याय होते. एक म्हणजे कार्यक्रम थांबवणं किंवा ती कृती करणाऱ्याला शरम वाटेल असं कृत्य करून स्वत:चं धाडस वाढवणं... आणि मी तेच केलं', अशी स्पष्ट भूमिका रेबेकानं मांडली. रेबेकाच्या या कृतीचं कार्यक्रमाच्या आयोजकांनीसुद्धा समर्थन केलं.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
KKR
(20 ov) 180
|
VS |
GT
181/5(19.4 ov)
|
| Gujarat Titans beat Kolkata Knight Riders by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MI
(20 ov) 195/6
|
VS |
PBKS
198/3(16.3 ov)
|
| Punjab Kings beat Mumbai Indians by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 146
|
VS |
RCB
149/5(15.1 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Lucknow Super Giants by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.