बाबा वेंगाची 2025 वर्षातील सर्वात मोठी भविष्यवाणी खरी ठरणार? पाकिस्तानात... डोनाल्ड ट्रम्प यांच्या खुलाशामुळे जगात खळबळ

baba vanga predictions 2025 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तानसारखे देश अणुचाचण्या करत असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अशातच बाबा वेंगाची 2025 वर्षातील सर्वात मोठी भविष्यवाणी चर्चेत आली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Nov 3, 2025, 05:57 PM IST
बाबा वेंगाची 2025 वर्षातील सर्वात मोठी भविष्यवाणी खरी ठरणार? पाकिस्तानात...  डोनाल्ड ट्रम्प यांच्या खुलाशामुळे जगात खळबळ

Pakistan Conducting Nuclear Test Donald Trump Claims : प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा याची भविष्यवाणी नेहमीच चर्चेत असते. अशातच  बाबा वेंगाची 2025 वर्षा बाबत केलेली सर्वात मोठी भविष्यवाणी खरी ठरणार अशी भिती व्यक्त केली जात आहे.  पाकिस्तान गुहेत अणुचाचण्या करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खुलाशामुळे जगात खळबळ माजली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

2025 मध्ये युरोपला जागतिक किंवा प्रादेशिक युद्धाचे परिणाम भोगावे लागू शकतात. अशी भीती आहे की या युद्धात अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो. अशा परिस्थितीमुळे व्यापक विनाश, जीवितहानी आणि लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ शकते, ज्यामुळे अनेक क्षेत्रे निर्जन होऊ शकतात अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे ही भविष्यवाणी खरी ठरतेय की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

पाकिस्तान सक्रियपणे अणुचाचण्या करत असल्याचे उघड केले आहे असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. रशिया, चीन आणि उत्तर कोरियासह पाकिस्तानच्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका देखील स्वतःची अणुचाचणी प्रक्रिया पुन्हा सुरू करेल. ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिकेकडे जगातील सर्वात जास्त अण्वस्त्रे आहेत आणि चाचणी करण्यात ते मागे राहणार नाहीत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच अणुचाचणीची घोषणा केली. त्यांनी सांगितले की अमेरिका तातडीने अणुचाचणी पुन्हा सुरू करेल. त्यानंतर आता ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या अणुचाचण्यांबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. ट्रम्प यांनी उघड केले की पाकिस्तान सक्रियपणे अणुचाचण्या करणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट आहे. ते म्हणाले की रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान सारख्या देशांच्या कारवाया हे पुरावे आहेत की अमेरिकेनेही पुन्हा अणुचाचण्या सुरू कराव्यात.

एका  कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले, "रशिया आणि चीन चाचण्या करत आहेत, पण त्याबद्दल बोलत नाहीत. आपण एक मुक्त समाज आहोत; आपण बोलतो कारण आपल्याकडे मुक्त प्रेस आहे." ट्रम्प पुढे म्हणाले, "आपण चाचण्या करू कारण ते चाचण्या करत आहेत. उत्तर कोरिया चाचण्या करत आहे, पाकिस्तान चाचण्या करत आहे." रशियाने नवीन अण्वस्त्रांच्या चाचणीनंतर 30 वर्षांनंतर आणखी एक अणुचाचणी करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल विचारले असता त्यांनी हे विधान केले. "रशियाने चाचणी करण्याची घोषणा केली आहे. उत्तर कोरिया सतत चाचणी करत आहे. इतर देशही करत आहेत. आम्ही एकटेच असे करत नाही आहोत आणि मला असे वाटत नाही की आम्ही चाचणी न करणारा एकमेव देश असू," ट्रम्प म्हणाले.

FAQ

1 बाबा वेंगाची २०२५ साठीची भविष्यवाणी काय आहे?
बाबा वेंगाने भविष्यवाणी केली आहे की २०२५ मध्ये युरोपला जागतिक किंवा प्रादेशिक युद्धाचे परिणाम भोगावे लागू शकतात. या युद्धात अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो, ज्यामुळे व्यापक विनाश, जीवितहानी आणि लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ शकते. यामुळे अनेक क्षेत्रे निर्जन होऊ शकतात.

2 डोनाल्ड ट्रम्पच्या दाव्यानुसार पाकिस्तान काय करत आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की पाकिस्तान सक्रियपणे अणुचाचण्या करत आहे. ते म्हणाले की पाकिस्तान गुहेत (खोल भूमिगत) अणुचाचण्या करत आहे.  रशिया, चीन आणि उत्तर कोरियासह पाकिस्तानच्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका देखील स्वतःची अणुचाचणी प्रक्रिया पुन्हा सुरू करेल.

3 ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अणुचाचण्या सुरू करण्याबाबत काय सांगितले?
ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिकेकडे जगातील सर्वात जास्त अण्वस्त्रे आहेत आणि चाचणी करण्यात ते मागे राहणार नाहीत. ते म्हणाले, "रशिया आणि चीन चाचण्या करत आहेत, पण त्याबद्दल बोलत नाहीत. उत्तर कोरिया चाचण्या करत आहे, पाकिस्तान चाचण्या करत आहे." 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More