900 दिवसांनंतर जगाचे काय होणार? बाबा वेंगांची धक्कादायक भविष्यवाणी ऐकून सर्वांनाच बसेल धक्का

900 दिवसांनंतर जगाचे काय होणार? बाबा वेंगांची धक्कादायक भविष्यवाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 21, 2025, 09:03 PM IST
900 दिवसांनंतर जगाचे काय होणार? बाबा वेंगांची धक्कादायक भविष्यवाणी ऐकून सर्वांनाच बसेल धक्का

Baba Venga Prediction:  2025 ची सुरुवात महाभयंकर असेल अशी भविष्यवाणी प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा याने केली होती. बाबा वेंगाने भाकित केल्याप्रमाणे 2025 या वर्शात अनेक भयानक घडल्या आहेत. हे वर्ष अजून 7 महिने बाकी अशातच आता बाबा वेंगाची आणखी भविष्यवाणी चर्चेत आली आहे. 900 दिवसांनंतर जगाचे काय होणार? याचे भाकित बाबा वेंगाने केल आहे. बाबा वेंगांची धक्कादायक भविष्यवाणी ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. 

बाबा वेंगा हा नेत्रहीन आहे. 911 मध्ये बाबा वेगांचा जन्म आणि मृत्यू 1996 मध्ये झाला होता. पण बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केलीय. प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची नेहमीच चर्चा असते. भूकंप,  भू-राजकीय तणाव, जागतिक आर्थिक संकाटाची चाहूल अशा घटना 2025 मध्ये घडू शकतात अशी भविष्यवाणी बाबा वेंगान केली होती. यापैकी अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचे दिसत आहे.

900 दिवसांनी म्हणजेच 2028 या वर्षात बाबा वेंगाने केलेली भविष्यवाणी खरी ठरली तर संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलू शकते. 2028 मध्ये पृथ्वीवरून भूकमारीची समस्या पूर्णपणे नष्ट होईल. म्हणजेच आजपासून सुमारे 900 दिवसांची जगात कोणत्याच देशाला भूकमारीच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.  2028 मध्ये नवीन उर्जेचा शोध लागेल. 2028 मध्ये नवीन ऊर्जा स्रोत सापडेल, ज्यामुळे सध्याचे जागतिक ऊर्जा संकट संपेल असा  असा दावा केला जात आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की यामध्ये न्यूक्लियर फ्यूजन, हायड्रोजन ऊर्जा किंवा क्वांटम बॅटरीसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश असू शकतो.

शुक्र ग्रहावर जीवनाचा शोध लागू शकतो. बाबा वांगाची तिसरी मोठी भविष्यवाणी अशी आहे की मानवजात 2028 मध्ये शुक्र ग्रहावर जीवनाचा शोध घेण्यास सुरुवात करेल, म्हणजेच अंतराळ संशोधन आणि आंतरग्रहीय मोहिमा एका नवीन पातळीवर पोहोचू शकतात. जरी या सर्व गोष्टी सध्या काल्पनिक वाटत असल्या तरी, बाबा वांगाच्या जुन्या भाकितेची अचूकता पाहून लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले आहेत.