'मोठं आर्थिक संकट येणार, तब्बल ₹137 लाख कोटी रुपयांची राखरांगोळी होणार' म्हणणारा 'हा' माणूस आहे तरी कोण?

Financial Crisis: संपूर्ण जग सध्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभं असून, आर्थिक संकटाच्या या त्सुनामीमध्ये कोट्यवधींच्या रकमेची राखरांगोळी होणार आहे.   

सायली पाटील | Updated: May 20, 2025, 04:03 PM IST
'मोठं आर्थिक संकट येणार, तब्बल ₹137 लाख कोटी रुपयांची राखरांगोळी होणार' म्हणणारा 'हा' माणूस आहे तरी कोण?
bank will sink rs 137 crore financial crisis coming soon alert issued know latest update

Financial Crisis: मागील काही वर्षांपासून संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं सावट असून, त्या संकटाशी दोन हात करण्यासाठी जागतिक स्तरावर सर्वच देश प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळ आहे. मात्र हे प्रयत्नही आता अपयशी ठरणार असून, संपूर्ण जगतच एका नव्या आर्थिक संकटाचा सामना करणार असल्याचा थेट इशारा प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार इनवेस्टमेंट एक्सपर्ट रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आहे. 

हे येणारं आर्थिक संकट इतक्या गंभीर स्वरुपातील असून त्यामध्ये एकदोन नव्हे, तर तब्बल 137 लाख कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rich Dad Poor Dad चे लेखक कियोसाकी यांच्या निरीक्षणानुसार त्यांनी X च्या माध्यमातून हा इशारा दिला आहे. 

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 1998 मध्ये वॉल स्ट्रीनं मिळून लाँग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट नामक एका हेज फंडला तारलं होतं. तर, 2008 मध्ये सेंट्रल अर्थात अनेक केंद्रीय बँकांनी वॉल स्ट्रीटचा बचाव केला. आता 2025 मध्ये या केंद्रीय बँकांना संकटातून कोण तारणार? हे जग ज्या आर्थिक संकटाच्या दिशेनं जात आहे त्यापासून या बँकांचाही बचाव जवळपास अशक्य आहे असा इशारा त्यांनी दिला. 

137 लाख कोटींचा खेळखंडोबा? 

कियोसाकी यांच्या इशाऱ्यानुसार 2025 मध्ये जगावर एक मोठं आर्थिक संकट ओढावणार असून, या संकटात 1.6 ट्रिलियन डॉलर म्हणजेच साधारण 137 लाख कोटी रुपयांचं थेट नुकसान अपेक्षित आहे. मुळात हे संकट वर्तमानातील कारणांमुळं ओढावलं नसून 1971 पासूनच त्याची पाळंमुळं इथवर पोहोचल्याचं म्हटलं जातं. त्यामुळं या आर्थिक संकटामध्ये तुम्ही स्वत:ला वाचवण्यावर भर दिला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. 

आर्थिक संकटात कुठे करावी गुंतवणूक? 

सध्याच्या घडीला कागदी चलनावर विश्वास ठेवणं म्हणजे एक जुगार ठरू शकतो. श्रीमंत माणसं पैसा कमवण्यासाठी काम करत नाहीत, असं स्पष्ट मत मांडल त्यांनी सर्वांनाच सोनं, चांदी, बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. 2012 मध्ये आपण अशाच एका आर्थिक संकटाचं सूतोवाच केल्याचा संदर्भ देताना त्यांनी Savings पेक्षा गुंतवणूक या संकटातून तुम्हाला तारून नेऊ शकते असाच स्पष्ट संदेश दिला.