Barack Obama and Michelle Obama: अमेरिकेमध्ये सुरू असणाऱ्या घडामोडी सातत्यानं साऱ्या जगाचं लक्ष वेधताना दिसत आहेत. पण, सध्या फक्त राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याच्या प्रतिक्षेत असणारे ट्रम्पच नव्हे, तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेसुद्धा या चर्चांचा विषय ठरत आहेत. यामागचं कारण मात्र फारच अनपेक्षित आणि अमेरिकेत खळबळ माजवणारं आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
एकिकडे 20 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची चर्चा असतानाच दुसरीकडे मात्र बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या वैवाहिक नात्यात काही गोष्टी बिनसल्याचं लक्षात येत आहे. किंबहुना त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनीसुद्धा जोर धरला आहे.
बराक आणि मिशेल ओबामा यांच्या कार्यालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकातून दिलेल्या माहितीनुसार माजी राष्ट्राध्यक्ष या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसून, सोबतच मिशेल ओबामासुद्धा या शपथविधीसाठी उपस्थित राहणार नाहीयेत. जवळपास 2 पर्वांमध्ये अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून वावरणाऱ्या मिशेल ओबामा सध्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यासाठी येणार नसल्यामुळं आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीसाठी माजी राष्ट्राध्यक्ष यांनी सपत्नीक पोहोचणं हा परंपरेचाच एक भाग आहे. असं असतानाही मिशेल ओबामा यांची अनुपस्थिती अनेक चर्चांना वाचा फोडत आहे. यापूर्वी कार्टर यांच्या अंत्यविधीवेळीसुद्धा मिशेल ओबामा त्यांच्या पतीसमवेत पोहोचल्या नव्हत्या. एकाच महिन्यात जवळपास 2 महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचं पतीसोबत न पोहोचणं कैक चर्चांना वाव देऊन गेलं. पण, अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.
सर्वात प्रभावी जोडी...
जागतिक स्तरावर बराक आणि मिशेल ओबामा या जोडीला कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. अमेरिकेचे प्रथम नागरिक होण्याचा मान असो किंवा पदमुक्त झाल्यानंतर विविध सामाजिक कार्यांपासून इतरही अनेक उपक्रमांमध्ये त्यांचाय उ्लेखनीय सहभाग असो, ओबाना यांनी कायमच अनेकांपुढं आदर्श प्रस्थापित केला आहे. तेव्हा आता या जोडीच्या नात्याचं भविष्य नेमकं काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More
LIVE|
WI
205/9(74.5 ov)
|
VS |
NZ
|
| Full Scorecard → | ||
LIVE|
MAS
75/9(20 ov)
|
VS |
INA
78/3(9 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.