हे काय नवं? 'या' भारतीयांना अमेरिकेत प्रवेश नाही, व्हिसा नाकारणार... कारण ऐकून डोकं धराल!

US Visa Rules : सरकारी शटडाऊनमुळं दिवाळं निघण्याच्या वाटेवर असणाऱ्या अमेरिकेनं आता आणखी एक नियम लागू करण्याची तयारी केली असून, भारतीयांनाही त्याचा फटका बसणार आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 8, 2025, 08:39 AM IST
हे काय नवं? 'या' भारतीयांना अमेरिकेत प्रवेश नाही, व्हिसा नाकारणार... कारण ऐकून डोकं धराल!
big breaking america Donald trumps us may deny visas to persons having diabetes heart problem and other chronic disease

US Visa Rules : सरकारी शटडाऊननं (shutdown in america) संकटात सापडलेल्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अमेरिकेनं पुन्हा भारतीयांच्या अडचणीमध्ये भर टाकणारा एक निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशांनुसार आता ठराविक परदेशी नागरिकांना अमेरिकी प्रशासनाकडून थेट व्हिसा नाकारला जाणार आहे. याचा फटका अनेक भारतीयांनाही बसणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कोणत्या नागरिकांना अमेरिका प्रवेश नाकारणार? 

अमेरिकी प्रशासनाच्या नव्या निर्देशांनुसार मुधमेह अर्थात डायबिटीज, हृदयरोग, स्थूलता, कर्करोग (कॅन्सर) किंवा कोणताही मानसिक विकार आणि इतर कोणता गंभीर आजार असल्यास त्या परदेशी नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात येणार असून, त्या नागरिकांना ग्रीन कार्ड (Green Card) अर्थात अमेरिकी नागरिकत्वंसुद्धा नाकारलं जाऊ शकतं. या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी ट्रम्प प्रशासनाची तयारी सुरू असल्याची माहिती जागतिक स्तरावरील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावून जात आहे. 

परराष्ट्र विभागाच्या वतीनं जगभरातील अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांना पाठवण्यात आलेल्या निर्देश पत्रकांमध्ये 'पब्लिक चार्ज' नियमांमध्ये वाढ केल्याचं म्हटलं जात आहे. 

आजारपणं अधोरेखित होणार आणि... 

अमेरिकेच्या नव्या धोरणानुसार व्हिसा अधिकाऱ्यांना अशा अर्जांना चिन्हीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, ज्यांमध्ये वैद्यकीय कारणांवरून 'लाखो डॉलर खर्चा'ची गरज भासू शकते. नमूद केलेल्या या अटीअंतर्गत किंवा आजारांमध्ये श्वसनाचे आणि हृदयविकार, मेटाबॉलिक डिसॉर्डर, न्यूरोलॉजिकल इलनेस, स्थूलता, दमा, स्लीप एप्निया, उच्च रक्तदाब अशा आजार आणि व्याधींचाही समावेश आहे. 

हेसुद्धा वाचा : Trump नीति फसली! Tariff War च्या नादात अमेरिकेचं दिवाळं; पगाराशिवाय लोक करतायत नोकऱ्या, भारतीयांवर काय परिणाम?

 

प्रत्येक व्हिसासाठी हा नियम लागू 

तांत्रिकदृष्ट्या अमेरिकी प्रशासनाचा निर्णय सर्व प्रकारच्या व्हिसावर लागू असून, यामध्ये पर्यटन (B-1/B-2) आणि शिक्षणासाठीच्या (F1) व्हिसाचासुद्धा समावेश आहे. अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्वं मिळवण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या परदेशी नागरिकांवर आळा घालण्यासाठी हे धोरण अंमलात आणलं जात असल्याचं म्हटलं जात आहे. या नियमाअंतर्गत अर्जदारांना व्हिसा प्रक्रियेदरम्यान आपण कोणत्याही प्रकारच्या सरकारी रक्कम किंवा तत्सम आर्थिक मदतीवर अवलंबून नसून, आजीवन आपल्या उपचारांच्या खर्चासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत  हे सिद्ध करावं लागणार आहे. या निर्णयामुळं अमेरिकेमध्ये येत्या काळात लीगल इमिग्रेशनमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

FAQ

अमेरिकेने कोणत्या नव्या व्हिसा नियमांची घोषणा केली आहे?
ट्रम्प प्रशासनाने 'पब्लिक चार्ज' नियमांमध्ये वाढ केली आहे, ज्यामुळे ठराविक परदेशी नागरिकांना, विशेषतः भारतीयांना, व्हिसा नाकारला जाऊ शकतो. हे नियम वैद्यकीय स्थितींवर आधारित असून, ज्या व्यक्ती सार्वजनिक लाभांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे त्यांना प्रभावित करतात.

कोणत्या नागरिकांना अमेरिका प्रवेश नाकारला जाऊ शकतो?
मुधमेह (डायबिटीज), हृदयरोग, स्थूलता, कर्करोग (कॅन्सर), मानसिक विकार किंवा इतर गंभीर आजार असलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा नाकारला जाऊ शकतो. 

कोणत्या आजारांचा समावेश आहे?
नियमांनुसार, श्वसन विकार, हृदयविकार, मेटाबॉलिक डिसॉर्डर, न्यूरोलॉजिकल इलनेस, स्थूलता, दमा, स्लीप एप्निया, उच्च रक्तदाब इत्यादी आजार अधोरेखित केले जातात. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More