इराणच्या समुद्रकिनाऱ्यावर 'रक्ताचा पाऊस', लाल झालेल्या समुद्राच्या लाटांचा Video Viral, काय आहे कारण?

Iran Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लाल रंगाचे पाणी वेगाने समुद्रात वाहत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.   

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 13, 2025, 11:14 AM IST
इराणच्या समुद्रकिनाऱ्यावर 'रक्ताचा पाऊस', लाल झालेल्या समुद्राच्या लाटांचा Video Viral, काय आहे कारण?
Bloody Red Rain At Iran

Viral Video: सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पण आश्चर्य असे की हा पाऊस लाल रंगाचा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की लाल आणि रक्तासारखे काहीतरी समुद्रात वाहत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये काही लोकही दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत, कारण रक्तासारखी दिसणारी ही वस्तू तेथे मोठ्या प्रमाणात आहे. चला जाणून घेऊयात काय आहे हे... 

Add Zee News as a Preferred Source

लाल रंगाचे कारण काय आहे?

हा व्हिडीओ हॉर्मुझच्या प्रसिद्ध रेड बीचचा व्हिडीओ आहे. या अनोख्या दृश्यामुळे लोकांच्या मनात भीती आणि आश्चर्य अशा दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत. बऱ्याच लोकांनी याचा संबंध हवामान बदल किंवा काही गूढ घटनेशी जोडण्याचा प्रयत्न केला, जरी वास्तविकता अगदी सोपी आहे. खरे तर ते पावसाचे पाणी असते तसेच आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या मातीमुळे ते रक्तासारखे दिसते.

हे ही वाचा: मुंबईकर 'या' गंभीर आजाराच्या विळख्यात; कारण धक्कादायक!

 

गेल्या महिन्यात हा व्हिडिओ व्हायरल झाला होता

हा व्हिडिओही गेल्या महिन्यात समोर आला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ एका टूर गाईडने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'होर्मुझच्या प्रसिद्ध रेड बीचवर मुसळधार पावसाची सुरुवात. सेरासीमाच्या पर्यटकांसाठी हे दृश्य खूपच आश्चर्यकारक आहे. 

हे ही वाचा: 'मानव हरला, आम्ही हरणार नाही', TCS कर्मचाऱ्याच्या तेराव्याला मुलाचा फोटो पाहताच कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला

बघा Viral Video 

 

 

समुद्राच्या लाटाही लाल होतात

हा बीच इराणच्या होर्मुझ बेटावर आहे, ज्याला 'रेनबो आयलंड' असेही म्हणतात. हा भाग विरळ लोकवस्तीचा आणि निसर्गाने मोठ्या प्रमाणात अस्पर्शित आहे. ही अनोखी घटना वर्षभरात कधीही पाहता येते, त्यामुळे या बेटाला भेट देणारा कोणताही पर्यटक या आश्चर्यकारक दृश्याचा साक्षीदार होऊ शकतो. या लाल रंगामागील खरे कारण म्हणजे जमिनीत जास्त प्रमाणात असलेले आयर्न ऑक्साईड. जेव्हा ही खनिजे समुद्राच्या पाण्यात मिसळतात तेव्हा समुद्राच्या लाटाही लाल रंगाच्या दिसतात.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More