एलॉन मस्कनं विकली X ची मालकी; अब्जोंच्या सौद्यातून फायदा किती झाला माहितीये?

Elon Musk : जगभरातील श्रीमंतांच्या यादीत सातत्यानं आघाडीवर असणाऱ्या एलॉन मस्क यानं पुन्हा एकदा एक मोठा निर्णय जाहीर करत सर्वांनाच अवाक् केलं. 

सायली पाटील | Updated: Mar 29, 2025, 02:23 PM IST
एलॉन मस्कनं विकली X ची मालकी; अब्जोंच्या सौद्यातून फायदा किती झाला माहितीये?
business news Elon musk sell microblogging company x to xAI know the deal price

Elon Musk : व्यवसाय असो किंवा सोशल मीडियाशी संबंधित एखादं धोरण. एलॉन मस्क यानं कायमच संपूर्ण जगाला थक्क केल्याचं पाहायला मिळालं आहे. याच मस्कनं आता एक मोठा व्यवहार करत मायक्रोब्लॉगिंग साईट असणाऱ्या त्याच्या X या कंपनीची मालकी विकल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. 

Add Zee News as a Preferred Source

मस्कला या व्यवहारातून घसघशीत नफा... 

X ची मालकी विकत एलॉन मस्कनं तब्बल 33 अब्ज डॉलर इतका मोठा व्यवहार केला असून, यातून त्याला चांगलाच नफा झाल्याचं म्हटलं जात आहे. मस्कनं काही महिन्यांपूर्वीच X ची खरेदी 44 अब्ज डॉलर किमतीला केली होती. खरेदी आणि विक्रीच्या फरकामध्ये प्रथमदर्शनी मस्कला तोटा झाल्याचं लक्षात येत असलं तरीही दरम्यानच्या काळात  जाहिराती आणि X च्या इतर काही धोरणांच्या माध्यमातून त्यानं चांगली कमाई करत खर्च केलेली रक्कम वसूल केल्याची शक्यता नाकारता येत नाही असंच मत जागतिक स्तरावरील काही जाणकारांनी मांडलं. 

मस्कनं या मोठ्या व्यवहाराविषयीची माहिती देताना एक पोस्ट करत त्यामध्ये लिहिलं, 'xAI आणि X एकमेकांशी संलग्न असून डेटा, मॉडल, कम्यूटिंग, टॅलेंट, डिस्ट्रीब्यूशन या क्षेत्रात त्यानं झपाट्यानं प्रगती केली आहे'. या व्यवहारातून xAI ची अद्ययावत एआय क्षमता आणि X ची व्याप्ती एकत्र येत एक दर्जेदार प्रोडक्ट यातून जगापुढं येणार असल्याचं मस्कनं स्पष्ट केलं. 

मस्ककडे याआधीच स्पेस एक्स आणि टेस्ला या दोन बड्या कंपन्यांची मालकी असून, हल्लीच त्याच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारपदाची धुरा सोपवण्यात आली. मस्कच्या श्रीमंतीत दर दिवशी भर पडत असतानाच त्याचं X मध्ये असणारं योगदान जगभरात चर्चेचा विषय ठरलं. एक्सची सूत्र हाती आल्यानंतर त्यानं तेव्हाचं ट्विटर आताचं एक्स करत अर्थात त्याचं नामांतर करत कैक नवे बदल लागू केले आणि आता पुन्हा याच माध्यमाला मस्क एका नव्या स्तरावर नेऊ पाहत आहे हेच त्याच्या या नव्या निर्णयातून स्पष्ट होत आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More